नागपूर

धैंचा वनस्पतीने कृत्रिम खताची निर्मिती; वाढते जमिनीची सुपीकता

नीलेश डाखोरे

नागपूर : शेतातील पूरक अन्नद्रव्य, जीवजंतू रासायनिक खत आणि विषारी कीटकनाशकाच्या वापराने नाहीसे होतात. त्यामुळे शेत जमिनीची सुपीकता लयास जात आहे. अल्पावधीतच धान पिकावर विविध रोगांची लागण होताना दिसते. रासायनिक खत आणि विषारी कीटकनाशकांचा विपरीत परिणाम मनुष्यावर होतो. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतात हिरवळीचे ‘धैंचा’ वनस्पतीचा वापर सुरू केला आहे. या ‘धैंचा’ वनस्पतीने कृत्रिम खतांची निर्मिती होऊन रासायनिक खतांचा वापर कमी केला जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जमिनीची सुपीकता अबाधित राहावी यासाठी कृषी विभागामार्फत अनेक उपाययोजना सुचविल्या गेल्या आहेत. मात्र, शेतकरी अल्पावधीतच जास्त पीक हाती यावे यासाठी कृषी विभागाच्या शेतीविषयक सूचनेकडे दुर्लक्ष करून रासायनिक खताचा वापर करतात. यामुळे उत्पादनात जरी वाढ होत असली तरी जामिनीची सुपीकता नष्ट होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समिती कृषी विभागाअंतर्गत धान शेतीपूर्वी मशागत करून धैंचासारख्या वनस्पतीची पेरणी करून ठेवतात. धानपीक रोवणीदरम्यान शेतात वाढलेल्या धैंच्यावनस्पतीला वाहून शेतातच कुजविले जाते. कंपोस्ट खत म्हणून याचा वापर केला जातो. स्वनिधी योजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदान तत्त्वावर पंचायत समिती विभागाकडून एकरी २० किलोप्रमाणे वाटप केले जाते. तालुक्यातील खेडी चारगाव, डोनाला, बोथली आदी गावातील ६० शेतकऱ्यांनी या वनस्पतीचा लाभ घेतला आहे.

हिरवळीच्या खतासाठी धैंचाची लोकप्रियता वाढत आहे. भातासोबत ऊस, कापूस, नारळ, चहा, ज्वारी, गहू आदी पिकांनासुद्धा लाभदायक ठरत आहे. सोबतच श्यार आणि चोपन जमीन सुधारण्यासाठी या वनस्पतीचा लाभ होतो. मुळावरील गाठीमुळे हवेतील नायट्रोजनचे थिरिकरण होते. ५० टक्के फलावर आल्यानंतर शेतात गाळल्या गेल्याने धान पिकाला पोषक वातावरण होऊन ते पिकासाठी लाभदायक ठरते.

घरगुती शेणखत नाहीसे होताहेत

पाळीव जनावरांच्या तुटवड्याने घरगुती शेणखत नाहीसे होत आहे. त्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्राचा वापर करून धान शेती करताना दिसतो. त्यातही अत्यंत महागडे रासायनिक खते वापरून उत्पादनात वाढ होईल ये आशेपोटी अनेक रासायनिक खतांचा मारा शेतजमिनीत केला जातो. मात्र, धैंचा वनस्पतीने कृत्रिम खतांची निर्मिती होऊन रासायनिक खतांचा वापर कमी केला जात शकतो.

पंचायत समिती कृषी विभागाच्या सूचनेनुसार तीन वर्षांपासून या हिरवळी खताचा वापर करीत आहे. यामुळे जामिनीची सुपीकता अबाधित राहते. तसेच रासायनिक खत कमी लागते. इतरही शेतकऱ्यांनी या वनस्पतीचा प्रयोग करून पाहवा. नक्कीच लाभ होईल.
- विजय गड्डमवार, शेतकरी, बोथली
रासायनिक खताचा वापर कमी करून नैसर्गिक, कंपोस्ट आणि हिरवळी खतांचा वापर करून शेतजामिनीची सुपीकता वाढवावी. त्यामुळे या हिरवळी खतांची मागणी वाढत आहे. याचा नक्कीच लाभ शेतकऱ्यांना होईल.
- उमेशकुमार शिंदे, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती, सावली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Marathi News Live Updates : सीएसएमटी स्थानकातील वायफायवर सायबर हल्ला

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT