Farmers worried due to cloudy weather in Nagpur rural 
नागपूर

हरभरा, गहू पिकांवर ‘संक्रांत’ येण्याची भीती; ढगाळ वातावरणामुळे बळीराजा चिंतातुर

रवींद्र कुंभारे

गुमगाव (जि. नागपूर) : यावर्षी सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस झाल्याने परिसरातील बंधारे, विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन हातातून गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली. सध्या ही पिके जोमात आहे. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण आणि तुरळक प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाच्या ‘एन्ट्री’ने शेतकरी चिंतातुर झाले आहे.

यंदा हिंगणा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी सोबतच सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले. मात्र, यावर्षी अस्मानी संकटामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक मातीमोल झाले. हाती काहीच मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी कापणीच टाळली. शेतकऱ्यांनी शेतातील सोयाबीन न कापता त्यावर थेट ट्रॅक्टर चालवले. काहींनी रोटावेटर मारला.

सोयाबीन हातातून गेलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी सध्या शेतात हरभरा आणि गव्हाची पेरणी केली आहे. खरिपातील सोयाबीनकडून निराशा मिळाल्यानंतर शेतकरी रब्बी हंगामातील हरभऱ्याकडून अपेक्षा ठेवून असतानाच ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचे ‘ढग’ कायम असल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.

कृषी विभागाने मार्गदर्शन करावे

खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामात सुद्धा नुकसानच होण्याच्या चिंतेने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शेतातील पिकांची स्थिती आणि हवामानातील बदल लक्षात घेता कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मुंबई पुणे एक्सप्रेस वे'वर वाहतूक कोंडीतही टोल वसुली, मनसेच्या दणक्यानंतर पैसे परत करण्याचं IRBचं आश्वासन

T20 WC, IND vs PAK: भारतीयांसमोर पाकच्या फिरकीचे आव्हान; सायंकाळपर्यंत पावसाचा अंदाज, मात्र त्यानंतर खेळ होण्याची शक्यता

CM Yogi Adityanath: लाडक्या बहिणींना १५०० रुपये पेन्शन; योगी सरकारची मोठी योजना, पाहा कोणा-कोणाला होणार फायदा

Ind vs Pak: यालाच म्हणतात तयारी! पाकिस्तानला भिडण्यासाठी सूर्यकुमार यादव बनला ‘उस्मान तारिक’, नेट्समध्ये गोलंदाजीची हुबेहूब नक्कल

Satara Tourist Death: सातारच्या पर्यटकाचा राजगडावर हृदयविकाराने मृत्यू; सकाळीच्या सुमारास बालेकिल्ल्याचे दर्शन घेतलं अन् काय घडलं?

SCROLL FOR NEXT