Farmers worried over larvae outbreak on turf crop 
नागपूर

शेतकऱ्यांनो, तूर पिकावरील अळीच्या प्रकोपाने चिंतातूर आहात; कृषी विभागाचा हा सल्ला ठरेल महत्वाचा

अनिल रोडे

सिर्सी (जि. नागपूर) : उमरेड तालुक्यात यावर्षी तूर पीक चांगले होईल, असे वाटत होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रकोप वाढला आणि हाती आलेले तूर पीक उद्ध्वस्त होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतातूर झाला आहे. कृषी विभागाने वेळोवेळी पाहणी करून एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे.

खरीप हंगाम पूर्णत: हातावर तुरी देऊन गेला. सोयबीन, धान या पिकांनी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. कापूस लाल्या रोगाच्या तावडीत सापडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. खोड अळीने धान पीक कापणीला आले असताना उद्ध्वस्त झाले. आता तूर पीक शेंगांनी बहरले असताना ढगाळ वातावरणाने अळीला पोषक वातावरण तयार झाल्याने अळीचा प्रकोप वाढला आहे.

कृषी विभागाचा सल्ला

कृषी विभागाने तुरीवरील कीडीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला आहे. घाटे अळी ही तूर पिकासाठी घातक ठरत असते. घाटे अळी ही शेंगामध्ये छिद्र करून पीक उद्ग्ध्वस्त करते. अंड्यातून आलेल्या अळ्या प्रथम कोवळी पाने, देठ, फुलोर यांना फस्त करतात. ही अळी हिरव्या किंवा पोपटी रंगाची असते. शरीराच्या बाजूने करड्या रंगाच्या तुटक रेषा असतात. पतंग अवस्थेत पिवळसर तपकिरी रंगाची दिसते.

शेतातील पर्यायी खाद्यगवते नष्ट करावीत. इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत, अळी लहान अवस्थेत असताना एच. ए. एन. पी. व्ही. १० मिली. १० लिटर पाण्यात मिश्रण करून फवारणी करावी. तूर पीक फुलावर येताच ५ टक्के प्रवाही निंबोळी अर्काची फवारणी करावी. अळीचे प्रमाण जास्त असल्यास इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एस जी ४ ग्रॅम किंवा कोलोरंट्रानीप्रोल १८.५ टक्के एस जी ३ मिली किंवा स्पिनोसँड ४५ टक्के प्रवाही २.५ मिली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT