file 
नागपूर

आईवडिलांच्या भांडणात मुलीने केली मध्यस्थी; वडील रागावले म्हणून मुलीने रागात काय असे करावे, वाचा..

सकाळ वृत्तसेवा

देवलापार (जि.नागपूर)  :  तापत्या उन्हात शेतावरून वडील घरी आले. क्षुल्लक कारणावरून पत्नीशी थोडेफार भांडण झाले. आईवडीलांचे भांडण न पहावल्याने मुलीने मध्यस्थी केली. वडीलांचा पारा आणखी भडकला. त्यावरून वडील मुलीवर संतापले अन्‌ बस एवढयाशा कारणावरून दुखावलेल्या मुलीने आईवडिलांना माहित न होता रागारागात शेतातील विहिरीत उडी घेउन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता.12) सकाळी उघडकीस आली.

दुचाकी चालविण्याच्या कारणावरून रागावले
मृत मुलीचे नाव भारती पांडुरंग मोरघडे (वय17)आहे. भारती यावर्षी अकरावीत शिकत होती. यंदा ती बारावीला गेली होती. हिचे आजोबा मेघराज मोरघडे यांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. खनोरा येथील पांडुरंग मोरघडे हे शेतकरी आहेत. ते शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेतातून घरी आले. काही विषयांवरुन पत्नी ोबत त्यांचे थोडे फार भांडण झाले. त्या भारती ही मध्यस्थी करण्याकरिता गेली असता वडिल पांडुरंग हे तिच्यावर गाडी चालविण्याच्या कारणावरुन रागावले. भारती काही वेळ घरात गुपचूप बसून होती. वडील पुन्हा शेतावर गेले व आई बाहेर कुठेतरी गेल्याची संधी साधून दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घरुन निघून गेली.

आईवडिलांनी केली शोधाशोध
त्यानंतर काही वेळाने तिची शोधाशोध सुरु झाली. ही माहिती वडिलांना मिळताच ते शेतातून परत येवून भारतीला शोधू लागले. सर्व नातेवाईक व परिसरातील विहिरीतही शोध घेतला. परंतू तिचा थांगपत्ता न लागल्याने सोमवारी पोलिसांत तक्रार केली. मंगळवारी हाकेच्या अंतरावर असलेले आजोबा मेघराज मोरघडे यांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह तरंगतांना आढळला. याबाबतची माहिती पोलिसांत देण्यात आली. ठाणेदार प्रवीण बोरकुटे व पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा व उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला.

मृतदेह वर येण्यास एक दिवसाचा विलंब
चार दिवसाच्या कालावधीत परिसरातील नातेवाईकाकडे व विहिरीत सर्वत्र भारतीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी या विहिरीतसुद्‌धा तिला शोधण्यात आले होते. परंतु ही विहिर फार खोल असून त्यात गाळ असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तिचा मृतदेह वर येण्यास एक दिवसाचा विलंब लागल्याचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांनी सांगीतले. गुन्ह्याची नोंद देवलापार पोलिसांनी घेतली असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक लक्ष्मी घोडके करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT