Father in law misbehaved with sons wife 
नागपूर

पवित्र नात्याला काळिमा! सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार; नातवाला जीवे मारण्याची दिली धमकी

अनिल कांबळे

नागपूर  ः घरात एकटी असलेल्या २६ वर्षीय सुनेला सासऱ्याने नातवाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ही खळबळजनक घटना कपिलनगरात उघडकीस आली. पी. रमेश (५८, उप्पलवाडी) असे आरोपी सासऱ्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिलनगरात राहणारी २६ वर्षीय पीडिता रिया (बदललेले नाव) हिचे पती ट्रक ड्रायव्हर आहेत. त्यामुळे ते नेहमी ट्रान्सपोर्टमुळे बाहेरगावी असतात. तिला आठ वर्षांचा मुलगा आहे. ती घरात शिलाई मशीनवर काम करते. तिचे पती ट्रक घेऊन मुंबईला गेले होते. त्यामुळे मुलासह ती राहत होती. दरम्यान तिच्या घराशेजारी तिच्या पतीची आत्या राहते. दोघांचेही चांगले कौटुंबिक संबंध आहेत. 

आत्याचा पती पी. रमेश ट्रान्सपोर्टचा मोठा व्यावसायिक आहे. तो नेहमी रियाच्या घरी येत-जात असे. दरम्यान रमेशची वाईट नजर रियावर पडली. तिचा पती घरी नसताना तो नेहमी यायला लागला. मुलाला महागडे गिफ्ट देणे तसेच रियालाही गिफ्ट देत होता. अनेकदा तो सून रियाशी अश्‍लील बोलण्याचा प्रयत्न करायचा. तसेच तिच्या सौंदर्याची स्तुती करायचा. सासरा असल्यामुळे रियाने ती बाब गांभीर्याने घेतली नाही. तीच बाब अंगलट आली.

घरी कुणी नसल्याची साधली संधी

रमेशच्या नातेवाइकाकडे लग्न असल्यामुळे कुटुंब बाहेरगावी गेले होते. ६ डिसेंबरला दुपारी १२ वाजता रमेश जेवण करण्यासाठी सुनेकडे आला. त्याने जेवण केल्यानंतर काही वेळपर्यंत तो तिच्या घरी झोपला. तासाभराने त्याने घराचे दार लावले आणि रियाला धमकावले. पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पवित्र नात्याला काळिमा

वडीलधाऱ्या असलेल्या सासऱ्याने चक्क सुनेला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. सासऱ्याच्या या कौर्यामुळे सून नैराश्‍यात गेली. तिने पती घरी येताच सर्व हकिकत सांगितली. पतीच्या मदतीने कपिलनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रमेशला अटक केली. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Dhyaneshwar Katke Accident : बालिकेच्या अपघातात आमदार ज्ञानेश्वर कटकेंची चूक होती का? दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप, काय घडलं नेमकं?

मोठा दावा : "रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याशिवाय टीम इंडिया २०२७ चा वर्ल्ड कप जिंकू शकत नाही!"

Pune: लोणी काळभोरमध्ये स्फोट! महिला गंभीर जखमी, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल

Latest Marathi News Live Update: बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेची विशेष तयारी

Nashik Politics : नाशिकच्या 'दुबई वॉर्ड'मध्ये राजकीय भूकंप! बालेकिल्ला असूनही मविआला उमेदवार मिळेना; कारण...

SCROLL FOR NEXT