Female condoms and how they are used 
नागपूर

गर्भधारणा टाळण्यासाठी फिमेल कंडोम किती फायद्याचे? जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आजच्या घडीला अनेक मुली व महिला नोकरी करीत आहेत. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच चांगले आयुष्य जगण्यासाठी त्यांनी नोकरी व व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. अशात घरच्यांच्या दबावात लग्न केले. मात्र, लग्नानंतर त्यांना लगेच गर्भधारणा नको असते. यामुळे अनेक मुली गर्भधारणेपासून वाचण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतात. अशा गोळ्या घेणे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकते. याला पर्याय म्हणून फिमेल कंडोम्स बाजारात उपलब्ध झाले आहेत. शारीरिक संबंध ठेवताना याचा वापर केल्यास पूर्णपणे सुरक्षा मिळते. चला तर जाणून घेऊ या फिमेल कंडोम्स विषयी माहिती... 

आपल्या देशात अद्याप कंडोम हा शब्द मोठ्याने उच्चारला जात नाही. तसेच कंडोमबद्दल उघड उघडही बोलले जात नाही. मग फिमेल कंडोमबद्दल बोलणे दूरचीच गोष्ट आहे. परंतु, महिलांना त्यांच्या आरोग्याशी व व्हजायनाशी निगडित सगळ्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. नोकरी करणाऱ्या मुली व महिलांना लवकर गर्भवती व्हायचे नसेल आणि हानिकारक गोळ्यांचाही वापर करायचा नसेल तर मार्केटमध्ये फिमेल कंडोम्स उपलब्ध झाले आहेत. भारतातही महिला कंडोम्स उपलब्ध आहे. पुरुष जसे कंडोमचा वापर करतात तसेच महिलाही या कंडोमचा वापर करू शकतात. 

बाजारात फिमेल कंडोम्स उपलब्ध झाले असले तरी महिलांना पडणारा प्रश्‍न म्हणजे ते सुरक्षित आहे का? आतापर्यंत या कंडोम्सबद्दल कोणत्याही चुकीच्या गोष्टी समोर आल्या नाही. त्याचे एक कारण म्हणजे जगभरातच या कंडोमचा वापर पाहीजे तसा होत नाही. मुली व महिलांमध्ये हे कंडोम वापरण्यासंदर्भात जनजागृती झालेली नाही. त्यामुळे मुली व महिला हे कंडोम न वापरण्यासाठी अनेक कारणे देतात. जर तुम्हाला हे कंडोम वापरायचे असेल तर एकदा आपल्या डॉक्‍टरचा सल्ला घेतलेला बरा... 

फिमेल कंडोम्यचे फायदे

  • गर्भनिरोधक गोळ्यांसाठी दुसरा चांगला पर्याय. 
  • नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी फायदेशीर. 
  • शरीरासाठी हानिकारक नाही. 
  • कोणतेही साईड इफेक्‍ट्‌स नाहीत. 
  • अनेक आजारांपासून बचाव. 

फिमेल कंडोम्सचे तोटे

  • फिमेल कंडोम्स बाजारात पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही. 
  • पुरुषांच्या कंडोमपेक्षा फिमेल कंडोम्य महाग आहेत. 
  • महिलांना या कंडोमची रिंग त्रासदायक वाटते. 

फिमेल कंडोम्स कसा दिसतो?

पुरुषांच्या कंडोम प्रमाणेच हे कंडोम असते. फक्त पुरुषांच्या कंडोमच्या तुलनेत याचा आकार मोठा असतो. या कंडोमची रिंग ही तुमच्या व्हजायनाकडे येते. हे कंडोम पॉलिथरीन व लॅटेक्‍स मटेरिअलमध्ये असते.

फिमेल कंडोम्स कसे वापरतात?

जर तुम्हाला टॅम्पॉन वापरायची माहिती असेल तर अगदी त्याचप्रमाणे तुमच्या व्हजायनामध्ये हे इन्सर्ट करायचे असते. जरी तुम्हाला ते त्रासदायक वाटत असले तरी मटेरिअलमुळे ते सहज आत जाते. या कंडोमच्या उघड्या भागावर रिंग असल्यामुळे ते व्हजायनाच्या आत जात नाही. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर हे कंडोम तुम्हाला थोडे ट्‌विस्ट करून काढायचे असते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT