The female doctor suicide in Nagpur 
नागपूर

हुंडाबळी : ‘माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करा’ अशी चिठ्ठी लिहित महिला डॉक्टरने घेतला गळफास

अनिल कांबळे

नागपूर : पती व सासूकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून होतकरू महिला डॉक्टरने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना बेलतरोडी हद्दीतील नरेंद्रनगरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा नोंदवीत डॉक्टर पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रुचिता रेवतकर (३०) असे मृताचे तर मंगेश रेवतकर (३७) असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणात सासू सुनंदा (५२) हिलाही आरोपी करण्यात आले आहे. रेवतकर कुटुंब उपेंद्र अपार्टमेंट, नरेंद्रनगर, सिद्धीविनायक मंदिरामागील रहिवासी आहे.

रुचिता व मंगेश यांना सहा वर्षांचा मुलगाही आहे. मंगेश धंतोलीतील खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. त्याने एप्रिल २०१६ पासून माहेरून पैसे आणण्यासाठी रुचिता यांचा छळ सुरू केला होता. सुनंदा मुलाला त्यासाठी चिथावणी देत असल्याचे सांगण्यात येते.

मंगळवारी सकाळी रुचिता व मंगेश यांच्यात वाद झाला. रुचिता यांनी नेहमीच्या कटकटीला कंटाळून जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. सकाळी ९ वाजता मंगेशलाच त्या गळफास लावलेल्या दिसल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून आत्महत्येपूर्वी लिहिलेली रुचिता यांची चिठ्ठी जप्त केली आहे.

चिठ्ठीत माहेरून पैसे आणण्यासाठी पती व सासू छळ करीत असून त्याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे. माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करा, अशी सूचनाही तिने केली आहे. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करीत मंगेशला अटक केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधीपासूनच हिंदीत होतेय K DRAMAची कॉपी ! माणिक-नंदिनीची गाजलेली मालिका आहे 'या' सिरीजवर आधारित

Latest Marathi News Live Update: प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Mappls : हायवेवर सिक्रेट स्पीड कॅमेरा कुठं आहे? गुगल मॅपपेक्षा भारी आहे 'हे' भारतीय App, जाणून घ्या महत्त्वाचं फीचर

Jalgaon Crime : धावत्या रेल्वेतून ३ कोटींच्या सोन्याची बॅग लंपास; बडनेरा रेल्वे स्थानकावर सराफा व्यावसायिकाला मोठा धक्का

Dhule Zilla Parishad : धुळे जि. प. अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव! ५६ गटांची आरक्षण सोडत जाहीर, २८ जागांवर महिलांना संधी

SCROLL FOR NEXT