Fifteen hundred crores fund for Nagpur medical hospital 
नागपूर

Nagpur : मेडिकलसाठी पंधराशे कोटी

श्रेणीवर्धन होणार : जिल्हाधिकाऱ्यांनी केले निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उपराजधानीतील मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेयोचे आगामी काळात श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. मेडिकलच्या श्रेणीवर्धनासाठी सुमारे ११०० कोटी तर मेयोच्या सुमारे ४०० कोटीचे प्रस्ताव येत्या दहा दिवसांत सादर करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी रविवारी केली. त्यांनी मेडिकल, मेयो भेट दिली. विशेष असे की, मेडिकलचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.

वर्षानुवर्षे कोट्यवधींच्या योजना राबविण्यासंदर्भातील घोषणांचा पाऊस शासनाकडून पाडण्यात येतो. प्रामुख्याने मेडिकलमध्ये तीन वर्षांपूर्वी स्पाईन इंज्युरी सेंटरसह लंग इन्स्टिट्यूट, प्रादेशिक वृद्ध उपचार केंद्र, प्रादेशिक पॅरामेडिकल केंद्र, सिकलसेल इन्स्टिट्यूट तयार करण्यात येतील असे सांगण्यात आले. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १ हजार कोटीपेक्षा जास्त निधीचे प्रस्ताव सादर करण्यात आले.

मात्र या प्रस्तावांचे काय झाले हे अद्याप सांगता येत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकल, मेयोच्या समस्यांचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील आठवड्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यात जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी मेडिकल, मेयोच्या समस्या जाणून घेतल्या. तर रविवार १६ ऑक्टोबरला दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना भेटी दिल्या.

यात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्यासह सर्व विभागप्रमुख तसेच मेयोच्या अधिष्ठाता डॉ. लीला अभिचंदनी यांच्यासह सर्व विभागप्रमुखांकडून त्यांच्या विभागाच्या आधुनिकीकरणासंदर्भात चर्चा केली. मेडिकलमध्ये एमबीबीएसचे केवळ दीडशे विद्यार्थी प्रवेश होत होते. परंतु ही संख्या वाढत गेली. आता मेडिकलमध्ये अडीचशे एमबीबीएसचे प्रवेश होतात. चार वर्षात १ हजार विद्यार्थी एकावेळी असतात.

यामुळे त्यांच्या शिक्षणाची तसेच त्यांच्या निवासाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. याच राज्य शासनाने मेडिकल आणि मेयो विकासाचा ध्यास घेतला असून लवकरच श्रेणीवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे संकेत मिळाले असल्यानेच तातडीने जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी मेयो आणि मेडिकलमध्ये निरीक्षण केले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे मेडिकलच्या श्रेणीवर्धनातून विकासाचे मॉडेल ठेवले. तसा दहा दिवसात प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

असे होईल श्रेणीवर्धन

मेडिकल, मेयो दोन्ही रुग्णालयातील अंतर्गत रस्ते, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अभ्यासासाठी मोठ्या वर्गखोल्यांसह सभागृह, दृकश्राव्य माध्यमातून अभ्यासाच्या युनिटची सोय, वैद्यकीय विद्यार्थी, शिक्षकांसाठी संदर्भकक्ष डिजिटल स्वरूपातील ग्रंथालये, विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्स, मोबाईल झोन, कॉम्प्युटर लॅबसह बी.एस्सी. नर्सिंग, व्यवसायोपचार, भौतिकपचार विभागाचे आधुनिकीकरण, मेडिकलपासून तर सुपर स्पेशालिटीमध्ये रुग्णांना पोहोचवण्यासाठी बॅटरी कार, कॅन्सर विभागाचे अत्याधुनिकीकरण, रेडिओलॉजी तसेच इतर विभागाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Charter Planes Safety : लहान चार्टर्ड विमानांमध्ये प्रवास करणे खरोखर धोकादायक आहे का?

Vani News : नरहरी झिरवाळ यांच्या आठवणींतील दादा…..

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

सोलापुरातील धक्कादायक घटना! पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा; पीडितेच्या बहिणीमुळे धक्कादायक प्रकार उघडकीस

Ajit Pawar: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रात शोक; मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकातही बदल

SCROLL FOR NEXT