Fighting between two groups after an accident in Nagpur 
नागपूर

मध्यरात्री भरचौकात कार आणि दुचाकीमध्ये झाला अपघात; भांडण सोडवत असतानाच पोलिसांना केली शिवीगाळ

अनिल कांबळे

नागपूर : कार आणि दुचाकीमध्ये अपघात झाल्यानंतर दोन गटांत राडा झाला. मध्यस्थी करण्यास आलेल्या पोलिसांनाही युवकांनी शिवीगाळ केली. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सम्यक भीमराव गजभिये आणि स्वप्नील दिलीप गजभिये हे दोघे कारने जात होते. रेडिसन ब्ल्यू हॉटेल चौकात दुचाकीने राहुल सुरेश सोमकुवर जात होता. कार आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. राहुल आणि स्वप्नीलमध्ये बाचाबाची झाली. दोघांनीही आपापल्या मित्रांना घटनास्थळावर बोलावले.

तेथे आरोपी गौरव पाटील, कल्पेश हिवाळे, आशिष गजभिये, राहुल लांबट आणि मेघराज गवकरे पोहोचले. दोन्ही गटात हाणामारी झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या प्रतापनगर पोलिसांनी भांडण सोडविले. परंतु, आरोपींनी पोलिसांना शिवीगाळ केली. याप्रकरणी सातही जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

युवकांवर प्राणघातक हल्ला

वंजारीनगर पाण्याच्या टाकीजवळ सूरज उर्फ गोलू सराटे (रा. इंदिरानगर) याच्यावर आरोपी दिनेश राही आणि आकाश व्यास या दोघांनी चाकूने हल्ला केला. गोलूसोबत दिनेशचा जुना वाद होता. शनिवारी रात्री नऊ वाजता गोलू हा दारू पिऊन वंजारीनगर चौकातून जात होता. त्याला आरोपी दिनेश आणि आकाशने गाठले. त्याच्यावर चाकूने हल्ला करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र, लगेच अजनी ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा फड हे घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी लगेच जखमी गोलूला मेडिकलमध्ये पोहोचवले. त्यांच्या सतर्कतेमुळे गोलूचा जीव वाचला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी दिनेश आणि आकाशला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT