Filed a case on the complaint of Maneka Gandhi 
नागपूर

बापरे! श्वानाला ठार मारण्याची धमकी; मनेका गांधींनी फोनवरून नोंदवली तक्रार, गुन्हा दाखल

राजेश रामपूरकर

नागपूर : बुद्धनगर येथील रस्त्यावर झोपलेल्या श्वानाला विष देऊन मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सौरभ आवळे असे गुन्हा दाखल झालेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. सौरभ झोपलेल्या श्वानाला जखमी करण्याच्या उद्देशाने नियमित कारने धडक देण्याचा प्रयत्न करीत होता असाही आरोप त्याच्यावर आहे.

प्राप्त माहितीनुसार, बुद्धनगर येथे राहणारे शुभम कांबळे हे परिसरातील मोकाट श्वानांना जेवण देतात. तसेच आजारी पडल्यास उपचार करतात. मात्र, शेजारी राहणाऱ्या सौरभ आवळे याला ते आवडत नव्हते. त्यामुळे सौरभ कायम शुभम यांना श्वानाला खाद्य देताना थांबवत होता. तसेच झोपलेल्या श्वानांना वाहनाच्या धडकेने जखमी करण्याचा प्रयत्न करीत होता.

त्याचे वाहन येताच श्वान पळून जात असे. जखमी झालेल्या श्वानांवर शुभम कांबळे उपचार करीत होते. मात्र, जेव्हा सौरभने श्वानांना विष देऊन ठार मारण्याची धमकी दिली, तेव्हा ती तक्रार पीपल्स फॉर ॲनिमलच्या संस्थापिका व माजी मंत्री मनेका गांधी यांना ई मेलच्या माध्यमातून केली. तक्रार प्राप्त होताच मनेका गांधी यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात दुरध्वनीवर संपर्क करून तक्रार नोंदवली.

दरम्यान, पीपल्स फॉर ॲनिमलच्या नागपूर प्रमुख करिश्मा गिलांनी यांना तक्रार करण्यास सांगितले. करिश्मा गिलानी यांच्या पुढाकाराने शुभम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर सौरभवर पशू क्रूरता निवारण अधिनियम १९६० सेक्शन ११ अतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 FULL SCHEDULE: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये लिंबू टिंबू संघ! गतविजेत्या RCB च्या गटात CSK; १०संघाचे वेळापत्रक एका क्लिकवर

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

SCROLL FOR NEXT