Filed a ransom charge against the owner of the Zero Degree Bar 
नागपूर

तपनच्या बारमध्ये नाचायच्या बारबाला, उधळले जायचे पैसे, गुन्हे शाखेने आवळला फास... 

अनिल कांबळे

नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी आणि एमआयडीसीतील झिरो डिग्री बारचा मालक तपन जयस्वाल याने आपल्या चार साथीदारांच्या मदतीने एका युवकाला खंडणीची मागणी केली. तसेच त्याच्याकडून पावणेदोन लाख रुपये उकळून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी तपन जयस्वालसह चौघांविरुद्ध खंडणीचे गुन्हे नोंदविले आहेत. याप्रकरणी तपन जयस्वालसह चौघांना गुन्हे शाखेने सोमवारी रात्रीच अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपन जयस्वाल भारतीय जनता युवा पक्षाचा मोठा पदाधिकारी आहे. जयस्वालचे एमआयडीसी परिसरात "झिरो डिग्री' आणि "एस' नावाने दोन बार आहेत. वादग्रस्त असलेल्या तपनच्या बारमध्ये अर्धनग्न होऊन बारबाला नाचतात आणि त्यांच्यावर शहरातील नामवंत व्यापारी, राजकीय नेते आणि गुंड प्रवृत्तीचे लोक लाखोंनी पैसा उधळतात, अशी चर्चा आहे. तपनने स्वःताच्या सुरक्षेसाठी हाताशी गुंडांच्या दोन ते तीन टोळ्या ठेवल्या असून, त्या टोळ्यांचा तपन "फायनान्सर' असल्याची चर्चा आहे. 

समीर दिलीपराव इंगळे (वय 28, गोपालनगर) याला आर्थिक अडचण असल्याने पैशांची नितांत गरज होती. तपन जयस्वाल (वय 40, रा. भेंडे ले-आउट) याने सावकारीचा अवैध व्यवसाय सुरू केला होता. तपन जयस्वालने फिर्यादी समीर इंगळे याला 19 एप्रिल 2019 रोजी 70 हजार रुपये दर आठवड्याला 15 टक्‍के व्याजाने दिले होते. तेव्हापासून तो दर आठवड्याला व्याज घेत होता. व्याज थकल्यानंतर तपन जयस्वालने कुख्यात सुपारी किलर गुंड विक्‍की गजभिये (28, खामला), बंटी बोरकर (वय 33, गोपालनगर) आणि समीर उर्फ बाळा राऊत (वय 28, गोपालनगर) यांना घेऊन समीरची भेट घेतली. त्याला पैशाची मागणी केली. तसेच त्याच्याकडून कोऱ्या धनादेशावर बळजबरीने स्वाक्षरी घेतली. त्यानंतर भीती दाखवून आतापर्यंत समीरकडून तपन आणि त्याच्या गुंडांनी लाखो रुपये उकळले. याप्रकरणी समीरच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी तपन जयस्वाल आणि त्याच्या टोळीवर गुन्हे दाखल केले आहेत. 
 

कळमेश्‍वर फायरिंगचा मास्टरमाइंड? 

तपन जयस्वाल याने तयार केलेल्या एका टोळीचा म्होरक्‍या गोलू मलिये आहे. तो गोलूकडून गुन्हेगारी कारवाया करून घेत होता. त्यामुळे कळमेश्‍वरमधील गणेश मेश्राम व त्याची पत्नी प्रियंकावर झालेल्या गोळीबार कांडाचाही तपन मास्टरमाइंड असू शकतो, अशी चर्चा आहे. याच संशयावरून तपनला गुन्हे शाखेने अटक केल्याची चर्चा आहे. 
 

तपनचा होणार "मंगेश-साहील' 


तपन जयस्वाल याचे काळे धंदे एक एक करून बाहेर निघत असून, सध्या बजाजनगरात पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच कळमेश्‍वर फायरिंगमध्येही त्याचा हात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तपन जयस्वाल प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रीती दास, मंगेश कडव आणि साहिल सैयदसारखी तपनची स्थिती होण्याची शक्‍यता आहे. 
 

तपनच्या घरातून पोतेभर दस्तावेज जप्त 


भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी असलेल्या तपन जयस्वाल याच्या घरातून गुन्हे शाखेला पोतेभर दस्तावेज मिळाले आहेत. यात व्याजाने दिलेल्या पैशाचा हिशेब, प्रॉपर्टीची कागदपत्रे, स्वाक्षरी असलेले कोरे धनादेश, गहाणपत्रे तसेच अनेकांच्या अंगठ्याचे ठसे असलेले स्टॅंपपेपरसुद्धा मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे तपन जयस्वाल याने अवैध सावकारीत जवळपास 100 ते 200 कोटी रुपये व्याजाने वाटल्याची शक्‍यता आहे. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT