Finally police constable becomes PSI
Finally police constable becomes PSI  
नागपूर

सकाळ इम्पॅक्ट : अखेर पोलिस हवालदार झाले पीएसआय; राज्यभर आनंदाचे वातावरण

अनिल कांबळे

नागपूर ः पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न बघत गेल्या सात वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिस हवालदारांना अखेर न्याय मिळाला.  हवालदारांचा हा लढा ‘सकाळ’ने लावून धरत वृत्तमालिका प्रकाशित केली होती. ‘सकाळ’च्या लढ्याला यश आले असून राज्यातील १०६१ हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली. त्यामुळे पोलिस दलात राज्यभर आनंदाचे वातावरण आहे.

प्रत्येक पोलिस कर्मचारी अधिकारी होऊन सन्मानाने निवृत्त व्हावा, अशी संकल्पना तत्कालिन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी मांडली होती. त्यानुसार २०१३ ला घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरिक्षक अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये जवळपास १८ हजार पोलिस हवालदार उत्तीर्ण झाले होते. काहींना पदोन्नती देण्यात येत होती. मात्र तेव्हापासून पदोन्नती देणे थांबविण्यात आले होते.

अर्हता परीक्षा उत्तीर्ण हवालदारांना पदोन्नतीसाठीच्या लढ्यात ‘सकाळ’ने वृत्तमालिका प्रकाशित करीत पाठपुरवठा केला होता. पोलिस महासंचालक, गृहमंत्री ते आस्थापना विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. शेवटी या लढ्याला यश आले. पोलिस महासंचालकांच्या आदेशाने आस्थापना विभाग प्रमुख राजेश प्रधान यांनी आज १०६१ पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती दिल्याची यादी प्रकाशित केली. यादी प्रकाशित होताच राज्यातील पोलिसांमध्ये उत्साह निर्माण झाला. अनेकांनी सोशल मिडियावरून एकमेकांना शुभेच्छा दिल्या तर ‘सकाळ’वर अभिनंदनाचा वर्षाव झाला. लवकरच पीएसआयच्या वर्दीत मुख्यालयात होणार आहेत. 

‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव

पीएसआय झालेल्या अनेक पोलिस हवालदारांनी ‘सकाळ’ वृत्तपत्र कार्यालयाला फोन करून शुभेच्छा दिल्या. तसेच सोशल मिडियावर ‘सकाळ’च्या नावाने अभिनंदन आणि शुभेच्छांचे संदेश फिरत होते. काहींनी तर प्रत्यक्ष ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देऊन आभार मानले. 

गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा 

राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी अधिक जोमाने कार्य करा. तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT