नागपूर : शहरात सार्वजनिक ठिकाणी खर्रा खाऊन थुंकणे, लघुशंका करणाऱ्यांविरोधात उपद्रव शोध पथकाची कारवाई जोमात सुरू आहे. आज २१६ जणांवर कारवाई करीत पथकाने ९० हजारांचा दंड वसूल केला. यात उघड्यावर लघुशंका करणाऱ्या चौघांचा समावेश आहे.
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे, कचरा फेकणे, थुंकणारे, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवारी शोध पथकाने २१६ प्रकरणांची नोंद करून ९० हजार रुपयाचा दंड वसूल केला.
उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या सहा जणांकडून १२०० रुपयांचा दंड वसूल केला. प्रत्येकाकडून ४०० रुपये प्रमाणे दंड आकाण्यात आला.
कारवाई उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे, हनुमाननगर झोनचे पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी केली.
भाजी विक्रेत्यांचाही समावेश
हातगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेत्यांवर परिसर अस्वच्छता केल्याप्रकरणी १७ हजार ६०० रुपये वसूल करण्यात आला. यात ४४ जणांवर कारवाई करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ४० व्यक्तीकडून १०० रुपये प्रमाणे चार हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
१० दुकानदारांकडून उल्लंघन
रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या १० दुकानदारांकडून प्रत्येकी चारशे प्रमाणे ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडरकडून मोकळ्या जागेत कचरा फेकल्याप्रकरणी प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे सहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
अस्वच्छता पसरविणाऱ्या ३५ संस्था
मंडप, कमान, स्टेज उभारून रस्ता बंद करणाऱ्या आठ जणांकडून सात हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ६६ व्यक्तींवर १३ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात खर्रा खाऊन रस्त्यांवर थुंकणाऱ्यांचा समावेश आहे. अस्वच्छता पसरविणाऱ्या ३५ संस्थांकडून ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.