fire sugarcane in a field in Nagpur district 
नागपूर

शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचे आपसात झाले घर्षण; हताश बळीराजाशी घडला असा दुर्दैवी प्रसंग

गोकुल वैरागडे

नांद (जि. नागपूर) : शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचे आपसात घर्षण होऊन उडालेल्या ठिणगीमुळे आग लागून शेतकऱ्याचे उसाचे पीक जळून खाक झाले. यामुळे प्रगतिशील शेतकरी माणिक कान्हुजी दांडेकर यांचे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले.

माणिक कान्हुजी दांडेकर यांचे शेत सुकळी (रिठी) येथे आहे. या शेतात आठ वर्षांपासून ते उसाचे उत्पादन घेत आहेत. उस उत्पादनाचे यंदाचे नववे वर्ष आहे. विशेष म्हणजे शेतातच उसावर प्रक्रिया करून गुळाच्या भेली बनवून मार्केटमध्ये विकतात. परंतु, विजेच्या तारांवर शार्टसर्किटमुळे जवळपास नऊ एकर जागेतील ऊस जळून राख झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

उसाला बोरमधील पाणीपुरवठा कमी पडत असल्याने त्यांनी ड्रिप संचाकरिता विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या उमरेड शाखेतून आठ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज घेऊन ड्रिप संच शेतात उभारला होता. परंतु, शेतातील विजेच्या तारांचे घर्षण झाल्याने शार्ट सर्किट होऊन आग लागून ऊस व ड्रिप संच जळून खाक झाला.

याबाबत माणिक दांडेकर यांनी फोनवरून स्थानिक लाईनमन ईश्र्वर वाकडे यांना सूचना केली असता लाईनमन वाकडे यांनी तत्काळ विद्युत पुरवठा बंद करून घेतला. तोपर्यंत ड्रिप संच व ऊस जळून खाक झाला होता. सदर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात १६ लाख रुपयांचे नुकसान झाले. विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाले असून, भरपाई मिळावी अशी मागणी दांडेकर यांनी केली.

यंदा दुहेरी नुकसान

यंदा अतिपावसामुळे सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे खरिपाचे पीक हातचे गेले. पाण्याची उत्तम सोय असल्याने दांडेकर यांना उस आणि इतर पिकांकडून अपेक्षा होती. परंतु, हाताशी आलेला ऊस जळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT