The first mohalla meeting in Joginagar
The first mohalla meeting in Joginagar 
नागपूर

(Video) जोगीनगरमध्ये पहिलीच मोहल्ला सभा, सर्वानुमते घेण्यात आले हे ठराव...   

प्रमोद काळबांडे

जोगीनगर (नागपूर) : मोहल्ला सभांतून आपले अधिकार स्थापित करण्यासाठी आज (ता. ७) जोगीनगर आणि रामटेकेनगर येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोहल्ला सभेचे आयोजन केले. पाऊस सुरू झाल्यावरही मोहल्ला सभा सुरूच होती, हे विशेष.

पंचायत राज व्यवस्थेमध्ये गावांमधील ग्रामसभांना अधिकार बहाल केले आहेत. आपल्या गावात कोणती कामे करावी आणि कोणती करू नये, हे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभांना आहे. शहरांतील मोहल्ला सभा, प्रभाग किंवा वाॅर्ड सभांनाही तेवढेच अधिकार कायद्याने बहाल केले आहेत. परंतु ग्रामसभांनी जसे आपले अधिकार सिद्ध करून दाखविले, तसे मोहल्ला सभांनी अजून सिद्ध केलेले नाहीत. त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात मोहल्ला सभा घेत आहोत. त्यातून प्रभाग 36 मधील नागरिकांचे अधिकार कायद्याने स्थापित करीत आहोत, अशी माहिती जोगी नगर येथील नागरिकांनी दिली.
  

मैदान वाचवा समितीही तयार

या मोहल्ला सभेतून जोगीनगर येथील मैदान वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. मैदान वाचवा समितीही तयार केली आहे. यापूर्वी मनपा आयुक्त ते विभागीय आयुक्तांपर्यंत सर्वच अधिकाऱ्यांना निवेदने दिली. परंतु अजून कुणीही आमच्या मागणीची दखल घेतली नाही.  मौजा बाबूळखेडा खसरा क्रमांक 64 / 4 ही मैदानाची अंदाचे पन्नास हजार चौरस फुट मोकळी जागा आहे. हे मैदान छोटी मुले, तरुण तसेच ज्येष्ठांसाठी एकमेव आशा आहे. त्यावर मनपाच्या वतीने टाकीचे बांधकाम करण्यात येत आहे. 

ठरावांची अंमलबजावणी करणे बंधनकारक 

या मैदानावर बांधकाम करू नये. इतरत्र करावे अशी मागणी केली. यामागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु आता आम्ही मोहल्ला सभांचे संवैधानिक अस्त्र उगारले आहे. मोहल्ला सभांतील ठरावांची अंमलबजावणी करणे, कायद्याने बंधनकारक आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. मोहल्ला सभेला संघदीप टेंभुर्णे, कृणाल तभाने, विनोद शेवडे, सोनू मंडपे, राजेश सोनटक्के, सुजित सोनारकर, विजू मस्के, अल्का कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क..

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT