file
file 
नागपूर

आधी ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय ते सांगा...

सुनिल सरोदे

 कन्हान (जि.नागपूर) : बीकेसीपी शाळा प्रशासन, संस्थेचे प्रतिनिधी यांनी जि.प.येथे झालेल्या बैठकीत ऑनलाइन शिक्षण व फी कमी करण्याच्या पालकांच्या समस्या निवारणाकरिता दहा दिवसाची वेळ मागितल्याने जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे व अधिकाऱ्यांनी शाळा व संस्थेला वेळ देऊन दहा दिवसात शाळा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्याची फी कमी करून पालकांचे समाधान न केल्यास शाळेची चौकशी लावणार असल्याचे बजाविले. त्याचबरोबर आधी ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय त्याचे स्पष्टीकरण देण्याचा आग्रह जि.प.अध्यक्षांनी केला.

पालकांच्या व्यथांची घेतली दखल
बीकेसीपी शाळा कन्हान येथे नर्सरी, केजी १ ते १० पर्यंत विद्यार्थी शिकत असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण देशात टाळेबंदी व संचारबंदीमुळे मार्च २०२० पासून शाळा बंद असताना विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आपात्काळ परिस्थितीत शाळेने विद्यार्थाना ऑनलाइन शिक्षण न देता पालकांना शाळेची फी भरण्यास तगादा लावुन अनेक समस्या निर्माण केल्याने जि.प.अध्यक्ष रश्मीताई बर्वे यांनी पालकांच्या व्यथाची दखल घेत बुधवारी (ता.२१) जिल्हा परिषद येथे अध्यक्ष बर्वे, मुख्यकार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका प्राथमिक, माध्यमिक व पालकांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका श्रीमती नाथ (माध्य), राव (प्राथ) यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने अध्यक्षांनी चांगलेच सुनावले. पालकांच्या समाधानाकरिता संस्था चालकांची सोमवारी (ता.२६) दुस-यांदा जि.प. येथे अध्यक्षा रश्मी बर्वे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मा शिवलिंग पटवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामणी वंजारी, पारशिवनीचे गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, संस्थेचे प्रतिनिधी भाटिया, शर्मा, मुख्याध्यापिका नाथ , राव व पालक यांची बैठक झाली. यात पालकांनी ऑनलाइन शिक्षण व फी समस्यांचे निवेदन देऊन समस्यांचे निराकरण करून फी कमी करण्याचा आग्रह केला.

हेही वाचाः ताई, दादा, मावशी, घ्या हो फुले! दुकानदारांचा आवाज हरवला

प्रश्‍नांचा केला भडीमार
यात बीकेसीपी शाळा प्रशासनाने ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय ते पहिले स्पष्टीकरण द्यावे, इयत्ता १० वी विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे वर्ष असून शाळेने आजपर्यंत ऑनलाइन लाईव्ह शिक्षण का दिले नाही, विद्यार्थ्यांचा फक्त ब्रॉडकास्ट ग्रुप बनवून त्यात मागील वर्षीच्या विद्यार्थ्याच्या नोटचे फोटो पाठवून ते वहित लिहिण्यास सांगितल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे फोनवर विद्यार्थ्यांचे निराकरण का केले नाही, महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने २०२०-२१ सत्राकरिता २५% कमी केलेल्या अभ्यासक्रम शाळेला माहित नसल्याने संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट शाळेने का पाठविले, दहावीच्या विद्यार्थ्यांना पाठविलेल्या प्रश्नपत्रिका बोर्ड पॅटर्ननुसार का पाठविल्या नाही, शाळेत १ ते ४ मराठी विषय सक्तीचा असून शिकविला जात नाही. परंतु ५ वीच्या बढती विद्यार्थ्याचा मराठीचा पेपर का घेण्यात आला, या  विषयाचे  जि.प.अध्यक्षांनी उत्तर मागितले. यावेळी प्रशांत वाघमारे, मोतीराम रहाटे, अशोक खंडाईत, आस्तिक चिंचुलकर, किशोर  वासाडे, सुनिल सरोदे, सुर्यभान फरकाडे, दिनेश नानव टकर, गजानन गजभिये, सुरेश खेरगडे, दिनेश ढोके, विजय पारधी, राजेश फुलझेले, कमरे आलम, संजय चोपकर, आंनद पाटील, अविनाश कांबळे, मोहसीन खान, सिंग, बुटेलिया, अरूण पोटभरेंसह दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT