Knief Attack Sakal
नागपूर

Nagpur Crime : आधी मस्ती नंतर प्रियकरावर चाकूने वार; दोघांविरोधात गुन्हा दाखल

रात्रभर प्रियकरासोबत घालविल्यानंतर झालेल्या भांडणातून प्रेयसीने प्रियकरावर चक्क चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना आली समोर.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - रात्रभर प्रियकरासोबत घालविल्यानंतर झालेल्या भांडणातून प्रेयसीने प्रियकरावर चक्क चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.१९) सकाळी सात वाजताच्या सुमारास गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घाटरोड मार्गावर असलेल्या ‘सिल्व्हरनेक्‍स्ट’ हॉटेलमध्ये उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत अशोक बेडगे (वय २७, रा. रामबाग कॉलनी, इमामवाडा) याची काही दिवसांपूर्वी त्याच्या कॉमन मित्राची मैत्रिण असलेल्या रिया (वय १९, बदललेले नाव) हिच्याशी ओळख झाली.

त्यानंतर दोघेही एकमेकांशी भेटू लागले. अनिकेत हा एका सावजी हॉटेलमध्ये कॅशिअर आहे. मुलगी परगावातून येथे शिकण्यासाठी आलेली आहे.

दरम्यान दोघेही एकमेकांना भेटू लागले. यातून दोघांनीही एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरवले. त्यानुसार अनिकेतने घाटरोडवरील ‘सिल्व्हर नेक्‍स्ट’ हॉटेलमध्ये रुम बुक केली. तिथे दोघेही रात्री भेटले. त्यानंतर दोघांनीही नशा केली.

दरम्यान त्या नशेत त्यांनी ताशपत्ते, लुडो आदी गेम खेळले.

पहाटेच्या सुमारास त्यांचे कुठल्या तरी कारणामुळे भांडण सुरू झाले आणि दोघेही एकमेकांना मारहाण करू लागले. त्यात रियाच्या हाती चाकू लागल्याने तिने त्याच्या मांडीवर आणि इतर ठिकाणी वार करीत जखमी केले. सकाळी साडेसहा ते सात वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यावर हॉटेलमधील व्यवस्थापकाने गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली.

पोलिस निरीक्षक पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन अनिकेत आणि मुलीला ताब्यात घेतले. दोघांनीही एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elephants Padma Menaka Dhruv : नांदणीनंतर 'या' मठांचे ३ हत्तीही जाणार? हायकोर्टाकडून नोटीस, शेडबाळ मठाच्या हत्तीचा समावेश

'माझ्यासाठी सिनेमा अनेक वर्ष पुढे ढकलला' पिळगांवकरांनी काढली दिग्दर्शकाची आठवण, म्हणाले,'माझ्यासोबत चित्रपट करणं त्यांची शेवटची इच्छा..'

Mumbai Local Viral Photo : एसी लोकलमध्ये प्रवाशाचा भन्नाट कारनामा; चक्क ट्रेनमध्ये छत्री उघडून प्रवास करतानाचा फोटो व्हायरल!

Beed News: कोरोनातली उधळपट्टी चौकशीच्या फेऱ्यात; बारा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी, सकाळ’ने वृत्तमालिकेतून टाकला होता प्रकाश

Ahilyanagar News: 'डॉ. आंबेडकर स्मारकासाठी जागेची पाहणी प्रक्रियेला गती'; राजकीय श्रेयावरून वादाची ठिणगी

SCROLL FOR NEXT