Five thousand bed "Covid Care Center" built in Nagpur 
नागपूर

Video तुकाराम मुंढेंनी करून दाखवले राज्यातील सर्वात मोठे कोव्हिड हॉस्पिटल

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  "कोरोना' विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे असून, कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास त्यांच्या सुविधेसाठी महापालिकेने पाच हजार बेडची क्षमता असलेले "कोव्हिड केअर सेंटर' उभारले. अल्पावधीतच तयार होणारे राज्यातील एकमेव सेंटर ठरण्याची शक्‍यता आहे.

शहरात दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे महापालिका विविध निर्णय घेत आहे. कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग न्यास या संस्थेच्या सहकार्याने आश्रम परिसरात पाच हजार बेडचे कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांमध्येच अंमलबजावणी केली. सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे 42 विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे.

मात्र, भविष्यात रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय तसेच त्यांच्यावर उपचार करता यावे, यादृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी "कोव्हिड केअर सेंटर' तयार केले. राधास्वामी सत्संग न्यासने सहकार्य करीत जागा तसेच मॅटीन, बॅरिकेटींग, कम्पार्टमेंट, साईडिंग, डोम उपलब्ध करून दिले. पिण्याचे पाणी आणि रुग्णांकरिता सात्विक भोजन ही सुद्धा व्यवस्था संस्थेने केली आहे. डॉक्‍टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे आदी व्यवस्था महापालिकेने केली.

500 बेड तयार, गरजेनुसार वाढविणार


सद्यस्थितीत 500 बेड तयार करण्यात आले असून गरजेनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. येथे महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडला क्रमांक देण्यात आले असून तोच रुग्ण क्रमांक राहील. प्रत्येक 100 बेडच्या मागे 20 डॉक्‍टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचा-यांची टिम कार्यरत असणार आहे.

स्वॅब घेण्याचीही सुविधा


विलगीकरण केलेल्या रुग्णांची तापमान तपासणी, रक्त तपासणीही येथे केली जाणार आहे. याशिवाय रुग्णांचे येथे स्वॅब घेण्यात येईल. स्वॅबच्या अहवालानंतर रुग्ण पॉझिटिव्ह असेल आणि प्रकृती अतिगंभीर असेल तरच त्याची रवानगी रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात करण्यात येईल. मात्र पॉझिटिव्ह असतानाही जर प्रकृती गंभीर नसेल, सहज उपचार शक्‍य असतील तर त्याला तेथेच अन्य कक्षात स्थलांतरित केले जाईल.

साखळी खंडित करण्यास सहकार्य करा
कोव्हिड केअर सेंटरमध्ये आवश्‍यकतेनुसार बेडची संख्या वाढविण्यात येत असून तब्बल पाच हजार बेडचे नियोजन आहे. मात्र ह्या सेंटरची गरजच पडू नये. शहरातून पूर्णत: कोरोना हद्दपार व्हावा, यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेत. पुढील काही दिवस घरीच राहावे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे.
-तुकाराम मुंढे, आयुक्त, मनपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT