नागपूर

तिसऱ्या लाटेपेक्षा मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या; वाचा काय सांगतात डॉ. गावंडे

केवल जीवनतारे

नागपूर : तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लहान मुलांना जपण्याची गरज आहे. लहान मुलांचे लसीकरण (Vaccination of children) या कालावधीत होणे शक्य नाही. यामुळे पालकांनी लहान मुलांच्या आहारविहाराकडे जातीने लक्ष देण्याची गरज आहे, असे मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे (Dr. Avinash Gawande) यांनी सांगितले. (Focus on the childrens diet rather than the third coronavirus)

लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, उलटी, खोकला, पोटदुखी, डोकेदुखी आदी लक्षणे नेहमीच आढळून येतात. यामुळे मुलांना कोरोना झाला आहे, असा भ्रम होऊ शकतो. अशी लक्षणे आढळून आल्यास पालकांनी घाबरू नये. त्वरित बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणीसाठी बोलावले तरच त्यांच्याकडे जावे. शक्य असल्यास डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधावा.

कोरोनाची लक्षणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर लगेच चाचणी करावी. अशा वेळी मुलांना घराबाहेर घेऊन जाणे टाळावे. इतर मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. पहिल्या लाटेत मुले कोरोनाच्या संसर्गाच्या लाटेत नव्हतीच. दुसऱ्या लाटेत एक टक्का मुलांना बाधा झाली असावी. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता हे प्रमाण वाढू शकते. यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावरच भर द्यावा. मुलांना १० तास झोपू द्या. सकस आहार, व्यायामाची सवय लावावी, असेही डॉ. गावंडे म्हणाले.

काय करावे

- मोबाईलपासून दूर ठेवा

- हात स्वच्छ धुण्याची सवय लावा

- बाहेर नेऊ नये

- सॅनिटायझरपेक्षा साबणाने हात वारंवार धुवा

- भौतिक अंतर ठेवण्याची सवय लावा

- पालकांनी मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवावा

- मुलांना नकारात्मक संस्कार होतील असे वागू नये

(Focus on the children's diet rather than the third corone virus)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT