Former Justice G.K. B. BJP demands city to file charges against Coal Patil 
नागपूर

माजी न्यायमूर्ती जी. बी. कोळसे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शहर भाजयुमोची मागणी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : माजी न्यायमूर्ती जी. बी. कोळसे पाटील यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आणि माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केले असून हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावे, असे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा शिवाणी दाणी यांनी पोलिस सहआयुक्‍त रवींद्र कदम यांना दिले आहे.


गेल्या रविवारी अलायन्स अगेन्स्ट सीसीए-एनआरसी-एनपीआरच्यावतीने नागपुरातील जाफरनगरात इदगाह मैदानावर संविधान जागरण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत माजी न्यायमूर्ती जी. बी. कोळसे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अनेक वादग्रस्त वक्‍तव्य केल्याचा आरोप दाणी यांनी केला आहे."पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांचा मृत्यू पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या गोळीतून नव्हे तर महाराष्ट्र पोलिसांच्या "पॉइंट नाईन' या पिस्तुलातून गोळी झाडून करण्यात आला होता. हे कृत्य मुंबई पोलिस दलातील हिंदुत्ववाद्याने केले असावे,' असा दावा कोळसे पाटील यांनी केल्याचा आरोप दाणी यांनी केला आहे. या वादग्रस्त विधानानंतर त्यांनी "मालेगाव बॉम्बस्फोटात अनेक वर्षे अटकेत असलेला कर्नल पुरोहित याने सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावरून काम केले होते. त्यानंतर त्याच कर्नल पुरोहितने डॉ. भागवत यांच्या हत्येचा कट रचला होता. तसेच त्यांची हत्या करण्यासाठी शार्प शूटर्सला "सुपारी'सुद्धा दिली होती,' असा आरोप माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी केल्याचा आरोप दाणी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्‍तव्य केले. वाजपेयी हे प्रत्येक विदेशी दौऱ्यावर जात असताना महिलांना सोबत नेत होते, असे वाद्‌ग्रस्त वक्‍तव्य कोळसे पाटील यांनी केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. कोळसे पाटील यांच्या भाषणाचे पडसाद शहरभर उमटले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या वक्‍तव्याचा निषेध व्यक्‍त करण्यात आला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षा शिवाणी दाणी यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन पोलिस आयुक्‍त कार्यालयात सहआयुक्‍त रविंद्र कदम यांची भेट घेतली. त्यांनी कोळसे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात सहआयुक्‍तांकडे लेखी तक्रार दिली. कोळसे पाटील यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 

माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी आक्षेपार्ह वक्‍तव्य केले आहे. त्यांच्या वक्‍तव्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते. अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरुद्ध त्यांनी गरळ ओकली आहे. त्यांच्याविरूद्ध आम्ही लेखी तक्रार पोलिसांत केली असून त्या संदर्भातील सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी शहानिशा करून त्वरित गुन्हे दाखल करावे.
- शिवाणी दाणी (अध्यक्षा, भाजयुमो)

कोळसे पाटील यांची आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्यासंदर्भात लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. तसेच एक पेनड्राईव्ह दिला आहे. स्पेशन ब्रॅंचकडून तक्रारीची चौकशी आणि शहानिशा केली जाईल. जर आक्षेपार्ह आणि कायद्याच्या विरोधात वक्‍तव्य असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- रवींद्र कदम (पोलिस सहआयुक्‍त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले ! मशि‍दीजवळ स्फोटात १५ ठार, ५० हून अधिक जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

३ महिलांनी बनवली फिल्म, ६०-६० लाखांच्या बजेटपासून तब्बल ३०० कोटींची कमाई; अवघ्या ४१ दिवसांत 'या' सिनेमाने रचला मोठा विक्रम

Garlic for High Cholesterol : सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने खरंच कोलेस्ट्रॉल कमी होते का? NCBI संशोधनातून काय समोर आले?

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

SCROLL FOR NEXT