नागपूर

माजी आमदाराने वाढविले टेंशन! गणेश मूर्तीचे विसर्जन करायचे कुठे?

राजेश प्रायकर

नागपूर : शहरातील तलावात विसर्जनाला बंदी असून महापालिकेच्या कृत्रिम टॅंकमध्ये नागरिकांनी गणरायाचे विसर्जन केले. एवढेच नव्हे मोठ्या मूर्तीचेही कृत्रिम टॅंकमध्ये विसर्जन करण्यात आले. परंतु, अजूनही अनेक गणेश मंडळांनी विसर्जन केलेले नाही. यात माजी आमदार प्रकाश गजभिये संयोजक असलेल्या हिलटॉप येथील एकता गणेश उत्सव मंडळाचाही समावेश आहे. येथील गणेशाची मूर्ती २० फूट रुंद आहे. या मूर्तीच्या विसर्जनावरून महापालिकेचे टेंशन वाढले आहे.

अनंत चतुर्दशीला १ लाख २७ हजार मूर्तीचे कृत्रिम टॅंकमध्ये विसर्जन करण्यात आले. याशिवाय अनेकांनी घरीही विसर्जन केले. सोमवारी गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम टॅंकमध्ये करण्यात आले. काल साडेसहाशे गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. याशिवाय आणखीही काही मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन शिल्लक आहे. परंतु, इतर गणेश मंडळाचे नव्हे तर महापालिका हिलटॉप येथील एकता गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाच्या नियोजनावरून ‘टेंशन’मध्ये आहे.

एकता गणेश उत्सव मंडळाची मूर्ती २० फूट रुंद असल्याने विसर्जनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे धरमपेठ झोनच्या सहायक आयुक्तांनीही संयोजक प्रकाश गजभिये यांची भेट घेतली. आतापर्यंत एकाही मूर्तीचे विसर्जन तलावात झाले नाही. परंतु, एकता गणेश उत्सव मंडळाच्या रुंद मूर्तीमुळे तलावात विसर्जनाची वेळ तर येणार नाही ना? अशी चिंता महापालिका अधिकाऱ्यांना लागली आहे.

या मूर्तीच्या विसर्जनासाठी गांधीसागर तसेच सोनेगाव तलाव परिसरात तयार करण्यात आलेल्या स्थायी कृत्रिम टॅंकचा पर्याय आहे. येथेच विसर्जनासाठी महापालिका माजी आमदार प्रकाश गजभिये यांना विनंती करीत आहे. एकता गणेश उत्सव मंडळाचा बाप्पा शहरातील मानाच्या गणेश मूर्तींपैकी एक आहे.

माजी आमदार गजभिये दरवर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवितात. यंदाही त्यांनी लसीकरण, रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यामुळे परिसरातीलच नव्हे तर शहरातील नागरिक येथे गर्दी करतात. या मंडळाच्या गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठीही भाविक उत्सुक आहेत. त्यामुळे आता माजी आमदार प्रकाश गजभिये विसर्जनाबाबत काय निर्णय घेतात? याकडे महापालिकेसह अनेकांचे लक्ष लागले आहे.

तलावाभोवतीचे संरक्षण न काढण्याचे आयुक्तांचे आदेश

तलावात गणेश मूर्ती विसर्जन होऊ नये यासाठी शहरातील गांधीबाग, सोनेगाव, फुटाळा, सक्करदरा, नाईक तलाव आदी भोवती टिनाची संरक्षक भिंत उभी केली आहे. शहरातील शेवटच्या गणेशमूर्तीचे विसर्जन होईस्तोवर तलावाभोवती असलेली संरक्षक भिंत काढू नये, असे आदेश आयुक्तांनी झोन कार्यालयाला दिले असल्याचे सुत्राने नमूद केले.

२४ सप्टेंबरला गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाईल. विसर्जनाची तयारी सुरू आहे. अद्याप विसर्जन कुठे करायचे हे निश्चित झाले नाही.
- प्रकाश गजभिये, माजी आमदार, संयोजक एकता गणेश उत्सव मंडळ, हिलटॉप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT