Four corona positive were found in Nagpur on Monday 
नागपूर

0, 2, 2, 4, 10 व 4 ही आकडेवारी फलंदाजांची नव्हे तर 'कोरोना'ची; या शहरात रविवारी वाढतात सर्वाधिक रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : बुधवारी 0, गुरुवारी 2, शुक्रवारी 2, शनिवारी 4, रविवारी 10 तर सोमवारी 4 ही आकडेवारी कोणत्या क्रिकेट सामन्याची नव्हे तर महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील "कोरोना'बाधितांची आहे. दिवस उजाडताच येथील रुग्ण संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. रविवार तर या शहरासाठी घातकच ठरला आहे. मागच्या रविवारी (ता. 12) रोजी 14 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर रविवारी (ता. 19) रोजी दहा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यातून सावरत नाही तोच सोमवारी आणखी चार रुग्णांची भर पडली आहे. 

शहरात 12 एप्रिल रोजी एकाच दिवशी 14 कोरोनाबाधित आढळले होते. यानंतरच्या रविवारी 19 एप्रिल रोजी एकाच दिवशी 10 रुग्णांची नोंद झाली. दर रविवारी कोरोनाचा प्रादुर्भाव अचानक वेग घेत असल्याचे दिसून येते. एकाच दिवशी उपराजधानीतील 10 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्यामुळे प्रशासन हादरले होते. तोच सोमवारचा दिवस उजडताच आणखी चार रुग्णांची भर पडल्याने प्रशासनाची चिंता आणखीनच वाढली आहे. 

रविवारी मेयोच्या प्रयोगशाळेतून आलेले 10 कोरोनाबाधित सतरंजीपुरा, शांतीनगर व कुंदनलाल गुप्तनगरमधील आहेत. यात पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. बाधितांमध्ये 13 वर्षीय मुलीसह 29, 33, 35, आणि 36 वर्षांच्या महिलांचा समावेश आहे. तर 13 आणि 15 वर्षांच्या मुलासह 32, 33 आणि 35 वर्षांच्या युवकांचा समावेश आहे. सर्वजण आमदार निवासातील विलगीकरणात असल्याची माहिती आहे. 

मेयोच्या प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात कोरोनाबाधित आलेले सर्व रुग्ण सहवासात आलेल्यांपैकी आहेत. सतरंजीपुऱ्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तयार झाली. रविवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमधील सर्व पुरुषांना उपचारासाठी मेयोत तर महिलांना मेडिकलमध्ये तातडीने हलवण्यात आले. कुंदललाल गुप्तनगरात प्रथमच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. 

सोमवारी चार रुग्ण आढळले असून, हे रुग्ण आमदार निवासातील विलगीकरण कक्षातील आहेत. आरोग्य विभागाकडून या रुग्णांकडून त्यांना विलगीकरणात आणण्यापूर्वी संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेणे सुरू आहे. त्यांनाही तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. आज वाढलेल्या रुग्णांमुळे नागपुरातील रुगणांची संख्या 77 झाली आहे. 

दररोज नवीन वस्तीत शिरकाव

नागपूर शहरात दररोज नवीन रुग्ण वाढळून येत आहेत. रविवारी तर रुग्णांची मोठी आकडेवारी समोर येते. तसेच दररोज कोरोना एका नवीन वस्तीमध्ये शिरकाव करीत असल्याचे दिसून येते. शांतीनगर, गिट्टीखदाननंतर आता कुंदनलाल गुप्तनगरात कोरानाने शिरकाव केला. यामुळे उपराजधानीवर कोरोनाचे संकट गडद होत असू, बाधितांची संख्या 77 वर पोहोचली आहे.

21 व्या दिवशीच्या चाचणीतही कोरोनाबाधित

एम्प्रेस सिटी परिसरातील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोनाबाधित 21 व्या दिवशी झालेल्या तपासणीत कोरोनाबाधित असल्याचा अहवाल पुढे आला. सर्वाधिक दिवस उपचारासाठी दाखल असलेला हा कोरोनाबाधित आहे. मेयोतील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे एका मुलीला मेयोतून सुटी होणार होती. रविवारी त्या 11 वर्षीय मुलीचा तिसरा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. सोमवारी पुन्हा अहवाल निगेटिव्ह आल्यास तिला कोरोनामुक्त घोषित करण्यात येईल. तिचे वडील कोरोनामुक्त झाले. मात्र, मुलगी बरी झाल्यावरच रुग्णालयातून सुटी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

80 टक्के रुग्ण सतरंजीपुरा येथील

नागपुरातील 72 बाधितांपैकी 80 टक्‍के रुग्ण सतरंजीपुरा झोनमधील आहेत. मंगळवारी झोनमधील 6 रुग्णांसह बजाजनगर, अभ्यंकरनगर, खामला, जरीपटका, एम्प्रेस सिटी, मोमिनपुरा, दलालपुरा, शांतीनगर, गिट्टीखदान भागात कोरोनाच्या प्रादुर्भावाचे 20 टक्के रुग्ण आढळले. रविवारी कुंदनलाल गुप्तनगरची भर पडली. यामुळे नव्या बाधिताच्या सहवासातील रुग्णांची साखळीत ही साखळी शोधून काढण्यासाठी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी परिश्रम घेत आहेत.

कोरोनाची आकडेवारी

  • दैनिक संशयित : 56 
  • एकूण संशयित : 1129 
  • सध्या भरती संशयित : 88 
  • एकूण भरती संशयित : 2290 
  • एकूण भरती सकारात्मक रुग्ण- 59 
  • दैनिक तपासणी नमुने: 62 
  • एकूण तपासणी नमुने: 1645 
  • आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने: 73 
  • घरी सोडलेले सकारात्मक रुग्ण : 12 
  • घरी सोडलेले संशयित : 1101 
  • आज अलगीकरण केलेले संशयित:27 
  • अलगीकरण कक्षात भरती संशयित ः 573 
  • अलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले संशयित ः 27 
  • पाठपुरावा सुरू असलेले एकूण संशयित ः 468 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT