four theft incident happened in nagpur crime news  
नागपूर

सावधान..! उपराजधानीत चोरांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

योगेश बरवड

नागपूर : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरूच आहे. मानकापूर, कपीलनगर, अजनी हद्दीत चोरी व घरफोडीच्या चार नव्या घटना उघडकीस आल्या आहेत. 

मानकापूर हद्दीतील रोज कॉलनी, श्याम लॉनजवळील रहिवासी नाजीम अली नईम अली (४५) हे १९ फेब्रुवारीला सकाळी घराला कुलूप लावून परिवारासह मुंबईला गेले होते. अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि बेडरुममधून सोन्याचे दागिने, डुप्लिकेट चावीचा गुच्छा व २०हजार रुपये रोख असा १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. कपीलनगर हद्दीतील चैतन्यनगर, भारत गॅस गोडाऊनजवळ, नारी रोड येथील रहिवासी रोमील तोतडे (३४) हे बुधवारी रात्री११.३० च्या सुमारास घराच्या मुख्य दाराला कुलूप लावून परिवारासह हैदराबादला गेले होते. चोरट्याने संधी साधली, मुख्य दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील अलमारीतील सोन्याची चेन, लॉकेट व मोबाईल असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. 

अजनीत राहणाऱ्या संजना बेंगुलकर (५५) या १२ फेब्रुवारीला कामानिमित्त नयन सोसायटी, आनंदनगर नकाक, कोपरी ठाणे येथे राहणाऱ्या आतेबहिणीकडे गेल्या होत्या. गुरुवारी त्या नागपूर रेल्वेस्थानकावर आल्या असता बॅगची पाहणी केली. त्यावेळी ६ हजार रुपये रोख आणि दागिने असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे लक्षात आले. खसाळा नाका येथील रहिवासी संतोषकुमार पांडे (४५) यांचे खसाळा रोड येथे पांडे ट्रेडिंग नावाने प्रतिष्ठान आहे. गुरुवारी दुपारी २.४० वाजताच्या सुमारास आपल्या मुलीला दुकानात बसवून ते कामानिमित्त बर्डीला गेले. त्याच सुमारास दोन महिला व दोन पुरुष प्रतिष्ठानात आले आणि टायर दाखविण्यास सांगितले. मुलगी टायर आणण्यासाठी दुसऱ्या रुममध्ये गेली असता चोरट्यांनी काउंटरमधील २ हजार ४२० रुपये व काउंटरच्या बाजूची ५० लाखांची रोख असलेली पिशवी असा एकूण ५२ हजार ४२ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. संबंधित पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. 

भुरट्या चोरट्यांना चोप -
चाकूचा धाक दाखवून वाटमाऱ्या करणाऱ्या दोन भुरट्या चोरट्यांना नागरिकांनी पकडून चांगलाच चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरुवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास भिलगाव शिवारात घडली. सुधीर मेश्राम (३१) रा. वृंदावननगर व पंकज धुरिया (३५) रा. कामठी रोड, पिवळीनदी अशी चोरट्यांची नावे आहेत. रनाळा येथील रहिवासी जयंत ठेंगे हे गुरुवारी रात्री कामावरून घरी परतत होते. भिलगाव शिवारात रनाळा रोडवरील कालव्याच्या बाजूने असलेल्या खडकाळ मार्गावर दोन्ही आरोपींनी ठेंगे यांना अडविले. चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा प्रयत्न केला. ठेंगे यांनी आरडा ओरड करताच परिसरातील नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी चोरट्यांना पकडून त्यांचा खरपूस समाचार घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT