Four thousand policemen deployed for New Year celebrations 
नागपूर

‘न्यू ईयर सेलिब्रेशन’साठी कडक बंदोबस्त; अकरानंतर रस्त्यावर दिसणाऱ्यांची रात्र पोलिस ठाण्यात

अनिल कांबळे

नागपूर : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई उत्सुक असतानाच पोलिस आयुक्तांनी चार हजार पोलिसांचा ताफा कडक बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. नाइट कर्फ्यू कायम ठेवण्यात आल्यामुळे ११ वाजेनंतर रस्त्यावर दिसणाऱ्यांची रात्र पोलिस ठाण्यात जाण्याची शक्यता आहे. नववर्षाचे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. थर्टीफर्स्ट दरम्यान शहरात कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे.

‘थर्टी फर्स्ट’च्या बंदोबस्ताबाबत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बंदोबस्ताची आखणी केली. नववर्षाचे स्वागत शांततेत करणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याकडेही लक्ष देण्याचे निर्देश अमितेशकुमार यांनी दिले आहेत. या दिवशी अपघात होऊ नये याचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे.

शहरातील विविध मॉल्स व गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. या ठिकाणी साध्या गणवेशातील पोलिस तैनात करण्यात येतील. फुटाळा तलाव, वेस्ट हायकोर्ट रोडवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल.

चिडीमारी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक व संबंधित पोलिस ठाण्यातील महिला सेलचे कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. मॉल्स व गर्दीच्या ठिकाणांची बॉम्ब शोधन नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

कोविडचे भान ठेवून मास्कचा वापर करा
नववर्षाचे स्वागत कायद्याच्या चौकटीत राहून करा. कोविडचे भान ठेवून मास्कचा वापर करा. रात्री अकरानंतर रस्‍त्यावर येऊ नका. भरधाव वाहने चालवू नका. कुटुंबीयांसह सेलीब्रेशन करा. दुसऱ्यांना त्रास होणार नाही, असे कोणतेही कृत्य करू नये. 
- अमितेश कुमार,
पोलिस आयुक्त

असा आहे बंदोबस्त

  • बंदोबस्तात तैनात अधिकारी व कर्मचारी - ४,३००
  • नाकेबंदी - ७५ ठिकाणी
  • फिक्स पॉइंट - १०० 
  • जीप पॅट्रोलिंग - १०० 
  • बीट मार्शल - १५० 
  • गुन्हे शाखा पथक - १२

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT