Four tigers die in three weeks in the state
Four tigers die in three weeks in the state 
नागपूर

दोन वाघांच्या झटापटीत गर्भवती वाघिणीचा मृत्यू; उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना

राजेश रामपूरकर

नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील उमरेड वन्यजीव परिक्षेत्रातील नाल्यावर दोन वाघांच्या झटापटीत गर्भवती वाघिणीचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. ही वाघीण अभयारण्यात नव्याने आली असल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यात गेल्या तीन आठवड्यांत चार वाघांचा मृत्यू झाला. त्यातील तीन वाघांची शिकार झाली असून, ही वाघीण झटापटीत दगावली.

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील उमरेड वन्यजीव परिक्षेत्रात वाघिणीचा मृत्यू झाल्याचे आढळले. काही दिवसांपूर्वी मेळघाट, ब्रम्हपुरी, गोंदिया वनक्षेत्रात संशयास्पद स्थितीत वाघाचा मृत्यू झाला होता. उमरेड वन्यजीव परिक्षेत्रात येणाऱ्या तास नियतक्षेत्रात गस्त करीत असताना वनरक्षकाला वाघिणीचा मृत्यू झाल्याचे आढळले.

विभागीय वनाधिकारी आर. बी. गवई यांना माहिती कळताच ते घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता एनटीसीएच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार वाघिणीला उपाश नाल्यापासून ५० मीटर जंगलात ओढत नेल्याचे दिसले. त्याच मार्गावर तिच्या पोटात सात ते आठ आठवड्याची चार पिल्ले वाटेत पडलेली दिसली. तसेच नाल्यात रक्त सांडलेले दिसले. 

एनटीसीएच्या एसओपीनुसार वाघिणीचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात वाघिणीच्या बरगड्या तुटलेला होता. गळ्याच्या खालील भागात दाताच्या खुणा आढळल्या. श्वसननलिका आवळल्यामुळे तुटलेली होती. वाघिणीचा मागील भाग, पोट अर्धवट खाल्लेले होते. शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोडे, डॉ. सय्यद बिलाल, डॉ. एल. ए. खान यांनी केले.

दोन वाघाच्या लढाईत वाघिणीचा मृत्यू झाला असावा. यावर्षी झालेल्या व्याघ्र गणनेत ती अभयारण्यात नव्याने दाखल झाल्याचे आढळते. संपूर्ण प्रक्रिया क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांच्या देखरेखीत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाचे प्रतिनिधी संजय करकरे, वसंत कहाळकर यांच्या उपस्थितीत पार पाडली.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT