Fraud of an army officer by Rs twenty five lakh 
नागपूर

‘कोणत्या खात्यात जास्त पैसे आहेत’ असे विचारल्यावरही उघडले नाही डोळे; मग आली रडण्याची वेळ

अनिल कांबळे

नागपूर : भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्याला सायबर क्रिमिनलने हायटेक पद्धतीने फसवून गंडा घातला. अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने दोन लाख ८७ हजार २२९ रुपये लंपास करण्यात आले. गौरव दिलीप तितरमारे (वय २८, रा. ममता को-ऑपरेटीव्ह सोसायटी, सोनेगाव) असे फिर्यादीचे नाव आहे.

गौरव हे भारतीय सैन्य दलात अधिकारी पदावर कार्यरत असून, मथुरा येथे सेवारत आहेत. त्यांनी आर्थिक व्यवहाराचे अधिकार बहीण श्रद्धा समीर तिजारे (वय ३०, रा. भावनगर, गुजरात) यांना दिले होते. त्यांची बहीण नेहमी त्यांचे बँक खाते हाताळायची. नागपूर ते भावनगर दरम्यान त्यांनी रेल्वेचे तिकीट ऑनलाईन बनवले होते.

पण, कोरोनाच्या टाळेबंदीमध्ये सर्व रेल्वेगाड्या रद्द झाल्या व तिकिटाचे पैसे परत मिळाले नव्हते. ते पैसे परत मिळवण्यासाठी श्रद्धा यांनी संकेतस्थळावर आयआरसीटीसीची माहिती जाणून घेतली व दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला.

त्या क्रमांकावरील व्यक्तीने त्यांच्या भावाच्या जयप्रकाशनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियातील बँक खात्याची माहिती घेऊन त्यातून दोन लाख ८७ हजार २२९ रुपये लंपास केले. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आरोपीने वापरली शक्कल

‘कोणत्या खात्यात जास्त पैसे आहेत’ असा प्रश्‍न सायबर क्रिमिनलने श्रद्धा यांना केला. ज्या खात्यात जास्त पैसे असतील, त्याच खात्यात रिफंड करण्यात येईल, असा विश्‍वास दाखवला. श्रद्धा यांनी साधेभोळेपणामुळे एसबीआयच्या खात्याची माहिती दिली. अशी शक्कल वापरून आरोपीने दोन लाख ८७ हजार रुपयांनी फसवणूक केली.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action: एफडीएची कारवाई! तिखट-गोड अन्नपदार्थाचा साठा जप्त

९ षटकार अन् ४ चौकार... Sanju Samsonचं वादळ थांबेना! आशिया कपपूर्वी पुन्हा ठोकलं स्फोटक अर्धशतक; VIDEO

BJP MLA Receives Death Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी अन् मुख्यमंत्री योगींनाही इशारा!

Heart Attack : पीएमपी चालकाला ह्रदयविकाराचा झटका; लक्ष्मी रस्त्यावरील घटना

Latest Maharashtra News Updates: माटुंगा येथे अ‍ॅक्टिवा-टॅक्सी अपघात, एक जखमी

SCROLL FOR NEXT