sambhaji nagpur pune
नागपूर

Fraud News : क्रिप्टोत परताव्याच्या आमिषाने ५४ जणांना दोन कोटींचा चुना

फसवणूक झाल्यानंतर एकेक करत अनेकजण आले समोर ; आभा इन्वेस्टमेंट लँड डेव्हलपर्सचे अध्यक्ष, संचालकाचा कारनामा

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - चिकलठाण्यातील मे. आभा इन्वेस्टमेंट लँड डेव्हलपर्सचे अध्यक्ष, संचालकांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नागरिकांना महिन्याकाठी सात टक्क्यांच्या आकर्षक परताव्याचे आमिष दाखविले. यातून ५४ जणांना दोन कोटी ३० लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आल्याची फिर्यादी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे, कोट्यवधींची फसवणूक करून आरोपी कार्यालय बंद करून पसार झाले आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त धनंजय पाटील हे करत आहे, अशी माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.

पंकज शिवाजीराव चंदनशिव, पत्नी प्रियंका चंदनशिव यांच्यासह त्यांचे साथीदार शिवाजी रोडे, सोमीनाथ चंदनशिव, सोमीनाथ नरवडे अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी रवी तुकाराम वीर (वय ३५, रा. गल्ली क्र. १०, कामगार कॉलनी, चिकलठाणा परिसर) यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

अशी केली फसवणूक

फिर्यादी वीर यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. दरम्यान, आरोपी शिवाजी रोडे (रा. हर्सूल सावंगी) याच्याशी वीर यांची ओळख होती. २०२२ मध्ये त्याने पंकज चंदनशिव हा मे आभा इन्वेस्टमेंट अँड लँड डेव्हलपर्स ही फर्म चालवीत असून तो शेअर ट्रेडिंगमधून क्रिप्टो करन्सी कमोडिटीज ट्रेडिंग आदी व्यवसाय करीत असल्याचे सांगून तो गुंतवणुकीवर महिन्याला ७ टक्के परतावा देत असल्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये एल्डोरा बिल्डिंग,

गोल्डन सिटी सेंटर, एमआयडीसी चिकलठाणा येथे पंकज चंदनशिव याची भेट घेतली. त्यानेही तेच आमिष दाखविले. त्यावरून २२ सप्टेंबर २०२२ रोजी १०० रुपयांच्या बाँडपेपरवर मेमोरंडम ऑफ अन्डरस्टँडिंग तयार केले. त्यावरून सुरुवातीला दोन लाख त्यानंतर ऑक्टोंबर २०२२ मध्ये अडीच लाख, जानेवारी २०२३ मध्ये तीन लाख, अशी साडेसात लाख रुपयांची गुंतवणूक रवी वीर यांनी केली.

या गुंतवणुकीवर महिन्याला ७ टक्क्यांप्रमाणे परतावा देण्याबाबत बाँडपेपर तयार केला होता. तसेच, आधार म्हणून वेगवेगळे धनादेशही दिले होते. ते धनादेश आरोपी शिवाजी रोडेच्या विनंतीवरून वटण्यासाठी टाकलेले नाहीत. दरम्यान, आरोपीने रवी वीर यांना जुलै २०२३ पर्यंत परतावा दिला. त्यानंतर त्याने परतावा देणे थांबविले. त्याला वारंवार पैशांची मागणी केली असता तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्याचे सांगून टाळाटाळ करू लागला होता.

अन् झाला भंडाफोड

गुंतवणूकदारांनी पैशांची वारंवार मागणी केली खरी, मात्र एक ऑक्टोबर २०२३ रोजी तो कार्यालय बंद करून गायब झाल्याचे समोर आले. त्यानंतर ५४ गुंतवणूकदार समोर आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक गौतम पातारे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live: सत्ता कुणाची? महाराष्ट्रातील २९ महापालिकांचे निकाल आज, राजकीय भवितव्य ठरणार

Solapur Accident: फळवणीत विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर तर दहाजण जखमी, मकर संक्रांतीच्या रात्रीची घटना!

Pune Municipal Election : पुण्यामध्ये ५३ टक्के मतदान! वाढलेल्या पावणेचार लाख मतदानाचा फायदा कोणाला?

PCMC Election : पिंपरी चिंचवडमध्ये ६० टक्के मतदान; काही केंद्रांवर सायंकाळीही रांगा

आयुष्यातला गोडवा

SCROLL FOR NEXT