प्रीती दासने सिताबर्डीतील एनआयटी कॉप्लेक्‍समध्ये गॅलक्‍सी कन्सलटन्सी सर्व्हिसेस नावाने कंपनी उघडली होती. उच्चशिक्षित तरुणांना मोबाईल करून सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ती अनेकांना गंडा घालायची. अभियंता नवल राधेश्‍याम पांडे (२८) रा. वर्धा हा मार 
नागपूर

कारागृहातून बाहेर येताच 'ती' महाठग पुन्हा पोलिसांच्या गराड्यात; पोलिस स्टेशनमधील कार्यक्रमाला उपस्थित 

राजेश प्रायकर

नागपूर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणारी महाठग प्रीती दास जामीनावर कारागृहाबाहेर येताच पुन्हा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गराळ्यात वावरायला लागली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तिने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रीती दासच्या कृत्यांची चर्चा होऊ लागली आहे.

प्रीती दासने सिताबर्डीतील एनआयटी कॉप्लेक्‍समध्ये गॅलक्‍सी कन्सलटन्सी सर्व्हिसेस नावाने कंपनी उघडली होती. उच्चशिक्षित तरुणांना मोबाईल करून सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ती अनेकांना गंडा घालायची. अभियंता नवल राधेश्‍याम पांडे (२८) रा. वर्धा हा मार्च २०१७ मध्ये प्रीतीकडे गेला. तिने त्याला ओसीडब्ल्यू कंपनीत २५ हजार रूपये महिन्याची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दीड लाख रुपये उकळले. 

तिने त्याला ओसीडब्ल्यूच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र दिले. तो ओसीडब्ल्यू कंपनीत गेला असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तो तिला पैसे परत मागत होता. पण, तिने पैसे परत केले नाही व धमकावत होती. प्रीती दासच्या कृत्याचे बिंग फुटल्यानंतर पांडे याच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापूर्वी पाचपावली पोलिस ठाण्यात एका व्यक्तीला लग्नाचे आमिष दाखवून लुबाडले. नागपूरसह भंडारा येथेही तिच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेने तिला विविध गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर तिची रवानगी कारागृहात करण्यात आली. जामीनावर कारागृहाबाहेर येताच पुन्हा तिने पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भुरळ घालणे सुरू केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तिने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यक्रम घेतले. एका आरोपी महिलेकडून पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस कर्मचाऱ्यांसोबत कार्यक्रम करणे किती योग्य, असा सवाल यानिमित्त करण्यात येत आहे. पोलिस वर्तुळात पुन्हा प्रीतीच्या कृत्यांची चर्चा झाली आहे, हे विशेष.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT