Fraud of Rs 40 lakh in the name of MBBS admission Nagpur crime news 
नागपूर

मुलीला डॉक्टर बनविण्यासाठी धडपडणाऱ्या पित्याची घोर निराशा; ॲडमिशनच्यान नावावर फसवणूक

अनिल कांबळे

नागपूर : नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतरही मुलीला डॉक्टर बनविण्याच्या जिद्दीस पेटलेल्या वडिलाला एका टोळीने हेरले. मुलीला सेटिंग करून एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मुलगी डॉक्टर होणार या आनंदाच्या भरात वडिलाने ४० लाख रुपये टोळीला दिले. मात्र, टोळीने मुलीला ॲडमिशन मिळवून दिली नाही. याप्रकरणी टोळीविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत अपार्टमेंट, स्नेहनगर येथे राहणाऱ्या राजू गजानन येरणे (५२) यांची मुलगी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. परंतु, नीट परीक्षेत तिला खुपच कमी गुण मिळाले होते. दरम्यान, येरणे यांनी कुठेतरी वैद्यकीय प्रवेशासंदर्भातील जाहिरात वाचली होती. त्या जाहिरातीत मोबाईल क्रमांक दिला होता. येरणे यांनी त्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता आरोपींना लागला.

१४ जुलै २०१७ साली शंकर मारोती मानवटकर (रा. गुमथळा, कामठी), सचिन उत्तलकर, सौरभ श्रीवास्तव आणि उल्हास नेवारे यांनी रामकृष्णनगर येथील भारतीय उच्च माध्यमिक शिक्षा परिषदेच्या कार्यालयात येरणे यांनी भेट घेतली. त्यावेळी आरोपींनी येरणे यांना मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, अशी बतावणी करून त्यांच्याकडून आरटीजीएसद्वारे वेळोवेळी ४० लाख रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी मुंबईला प्रवेश मिळणार नाही असे सांगून औरंगाबादला करून देतो असे म्हटले.

येरणे हे औरंगाबादला गेले असता आरोपी हे तेथे आलेच नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच येरणे यांनी आरोपींची भेट घेऊन त्यांना पैसे परत मागितले. त्यावर आरोपींनी त्यांना धनादेश दिले. परंतु, खात्यात पैसे नसल्याने धनादेश परत आले. याप्रकरणी येरणे यांनी धंतोली पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT