Funeral of Martyred Naresh Badole held in Nagpur  
नागपूर

शहिद नरेश बडोले अनंतात विलीन, शहिद बडोले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कृष्णा मस्के

नागपूर : काश्मीर मध्ये तैनात असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नरेश बडोले काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शाहिद झाले. मुळचे नागपूरचे असलेल्या शहिद बडोले यांच्यावर आज शासकीय इतमामात नागपुर जिल्ह्यातील हिंगणा तातुक्यात असलेल्या डिगडोह स्मशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. 

काश्मीर मध्ये तैनात असताना काल त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात ते जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादारम्यान त्यांचा मृत्यु झाला. काल उशिरा रात्री त्यांचं पार्थिव नागपूरात आणण्यात आलं. 

शहिद बडोले यांना पत्नी आणि दोन मुली आहेत. नागपूरच्या हिंगणा परिसरातील पांडुरंग नगर येथे त्यांचे निवासस्थान आहे. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यावर कुटूंबियांचा बांध सुटला. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं आणि शाहिद बडोले यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

फुलांनी सजविलेल्या रथात त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे रवाना झाली. यावेळी नागरिकांनी 'शहीद नरेश बडोले अमर रहे' च्या घोषणा दिल्या. त्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलिसांना हवेत तीन राऊंड फायर करत मानवंदना दिली. शहिद बडोले यांच्या दोन्ही मुलींनी त्यांना अग्नी दिला. तत्पूर्वी कुटुंबियांनी बुद्ध वंदना घेत त्यांना अखेरचा निरोप दिला 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT