ganja
ganja 
नागपूर

दारूची तहान भागवताहेत गांजावर, व्यसनासाठी काहीही...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : व्यसन माणसाला सवस्थ बसू देत नाही. संचारबंदीचा काळ दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्यामुळे दारूसारखे व्यसन करणाऱ्यांची पंचाईत होते आहे. व्यसनी मंडळी दारूसाठी काहीही करायला तयार आहेत. जिथुन कुठून दारू मिळेल, तिथुन ती मिळविण्याचा प्रयत्न हे लोक करताहेत. त्यामुळे दिवसेंदिवस दारूचा काळा बाजार वाढतो आहे. विदेशी नाही तर देशी आणि तिही नाही तर मोहफुलाचीही दारू या मंडळींना चालते आहे. ज्यांना तेही मिळत नाही, ते गांजावरच आपले व्यसन भागवित आहेत.
संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे मद्य विक्रीची दुकाने बंद आहेत. काळ्या बाजारात मद्याची चौपट दराने विक्री केली जात असल्याने शहरात गांजाची मागणी वाढली आहे. यशोधरानगर पोलिसांनी एका तस्कराला जेरबंद करून त्याच्याकडून दीड किलोवर गांजा जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 18 मार्चपासून शहरात संचारबंदी आणि लॉकडाऊन लागू झाले. त्यामुळे सर्वसामान्यांना दारू मिळत नाही. शिवाय नियमित मद्य पिणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप होत असून काहींनी तर सॅनिटायझरचा नशेकरिता वापर करण्यास सुरुवात केली. काहींनी नशेकरिता पर्याय म्हणून गांजाचा मार्ग पत्करला आहे. लोकांकडून मोठ्या प्रमाणात गांजाची मागणी करण्यात येत असून पोलसि बंदोबस्तात असल्याने तस्करांवर कारवाई होत नाही. पण, यशोधरानगर परिसरात एकजण गांजाची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

सविस्तर वाचा - पिस्तुलाच्या धाकावर तो मागायचा खंडणी, अखेर जेरबंद
अशी केली पोलिसांनी कारवाई
या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक एस. बी. खंडारे, उपनिरीक्षक एस. दराडे, सहाय्यक फौजदार विनोद सोलव, प्रकाश काळे, दीपक धानोरकर, गजानन गोसावी आदींनी सापळा रचून राजीव गांधीनगर परिसरातील संजय ऊर्फ बुद्रूक टिकमदास कुर्रे (29) रा. विनोबा भावेनगर याला ताब्यात घेतले. त्याच्या (एमएच-49, एएक्‍स-5561) क्रमांकाच्या मोपेडच्या डिक्कीत एक किलो 20 ग्रॅम गांजा सापडला. पोलिसांनी दुचाकी व गांजा जप्त केला असून आरोपीला अटक केली.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "मोदी आता गल्ली-बोळातही रोड शो करतील..." राज्यातील प्रचारसभांवरून ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

CSK vs RR : थाला चेन्नईमध्ये शेवटचा IPL सामना खेळणार? गतविजेत्या CSK चा लौकिक पणास; राजस्थानसमोर लागणार कस

Rahul Gandhi Accepts Challenge: आव्हान स्वीकारलं! PM मोदींसोबत जाहीर चर्चेसाठी राहुल गांधी तयार, म्हणाले, 'पण ते...'

Nasa Solar Flares : सूर्यावरील मोठ्या स्फोटांमुळे पृथ्वीवर आलं सौरवादळ; नासाने शेअर केले फोटो..

Mothers Day 2024 : तब्बल एक हजारांहून अधिक मातांकडून 'दूध दान'; काय खासियत आहे मिल्क बॅंकेची?

SCROLL FOR NEXT