garbage stored in every area Nagpur danger of Malaria
garbage stored in every area Nagpur danger of Malaria  
नागपूर

नागरिकांनो सावधान! कोरोनासह 'या' गंभीर आजाराचा धोका; गल्लोगल्ली कचरा; सफाई कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

राजेश प्रायकर

नागपूर ः महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रस्ते, वस्त्यांतील सफाईचे कर्तव्य सोडून पैशांसाठी खासगी बहुमजली इमारतींच्या परिसरात स्वच्छतेला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील अनेक वस्त्या तसेच रस्त्यांवर कचरा पडलेला आढळून येत आहे. एकीकडे निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांऐवजी नवीन भरती बंद आहे तर दुसरीकडे नोकरीवरील सफाई कर्मचाऱीही शहर स्वच्छतेला गांभीर्याने घेत नसल्याने पडलेल्या कचरा डासांचे निर्मितीस्थळ ठरले असून शहराला कोरोनानंतर मलेरियाचाही धोका निर्माण झाला आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक २, ४, ५, ११, १४, २३, २९, ३६, ३८ मधील अनेक वस्त्यांमध्ये रस्ते स्वच्छ होत नसल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी या भागात सकाळी रस्ते स्वच्छ करणारे सफाई कर्मचारी दिसून येत होते. अनेक कर्मचारी परिसरातील टपरीवर चहाचा घोट घेतल्यानंतर स्वच्छतेच्या कामाला लागत होते. परंतु गेल्या दोन वर्षात सकाळच्या वेळी मोजकेच कर्मचारी दिसून येत आहे. 

यातील अनेकजण निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ज्या कर्मचाऱ्यांकडे स्वच्छतेची जबाबदारी आहेत. तेही सकाळी गायब असल्याने नगरसेवकही संतप्त झाले आहेत. अंतर्गत वस्त्या तसेच रस्ते स्वच्छ होत नसल्याबाबत आतापर्यंत अनेक नगरसेवकांनी महापालिकेकडे तक्रारीही केल्या आहेत. परंतु तोकड्या मनुष्यबळाचे कारण पुढे केले जाते. परंतु अनेक सफाई कर्मचारी पगाराशिवाय पैशाच्या लालसेने बहुमजली इमारतीत स्वच्छता करताना दिसून येतात. 

अर्थात महापालिकेकडून वेतन घ्यायचे, परंतु काम बहुमजली इमारतीतील श्रीमंतांसाठी करायचे, असे प्रकार सुरू आहे. प्रभाग ३६, ३८, ११ या शहर सिमेवर असलेल्या वस्त्यांमध्ये अनेक बहुमजली इमारतीत तयार झाल्या असून स्वच्छतेसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच येथील नागरिक प्राधान्य देत आहे. महिन्याकाठी एका इमारतीकडून हजार ते तीन हजार रुपये सफाई कर्मचाऱ्याला मिळत असल्याचे समजते. अशा अनेक इमारतीत महापालिकेचे कर्मचारी सेवा देत असून महिन्याकाठी पंधरा हजार रुपयांपर्यंत ते घरी घेऊन जात असल्याचे एका नगरसेवका नमुद केले. 

अनेकदा झोन कार्यालयाकडे सफाई कर्मचारी मागितले असता वेळ निभावून नेली जाते. परंतु हे कर्मचारी स्वच्छतेत सातत्य ठेवत नसल्याने परिसरात दोन ते तीन दिवस कचरा साचलेला किंवा रस्त्यावर पालापाचोळा दिसून येत आहे. परिणामी डासांची संख्या वाढली आहे. यातूनच मलेरियाचा संपूर्ण शहराला धोका निर्माण झाला आहे.

तुंबलेली सिवेज लाईनसाठीही घेतात पैसे

शहरात नागरिकांकडील शौचालय सिवेज लाईनला जोडलेले आहे. अनेकदा घरामागील सिवेज लाईन तुंबल्याने शौचालयात घाण परत येते. याबाबत झोन कार्यालयात तक्रार केल्यानंतर सफाई कर्मचारी येऊन स्वच्छ करतात. परंतु समस्या पूर्ण निकाली काढण्याऐवजी वरवर कामे केली जाते. सिवेज लाईन पुन्हा तुंबल्यानंतर घरमालकांनाच कारणीभूत ठरवून तुंबलेली सिवेज लाईन स्वच्छ करण्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याचे सुत्राने नमुद केले.

झोन अधिकाऱ्यांनाही मलिदा

सफाई कर्मचाऱ्यांची ड्युटी कुठे आहे, तो काय करीत आहे, कामावर आहे की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त झोन अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बहुमजली इमारतीतून सफाई कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मिळकतीतून झोन अधिकाऱ्यांनाही मलिदा पोहोचविला जात असावा, अशी शंका काही नगरसेवकांनी व्यक्त केली.

नगरसेवकांचे अतिरिक्त आयुक्तांना पत्र

प्रभागातील अनेक सफाई कर्मचारी निवृत्त झाले असून काहींचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्या जागेवर कुणीही नसल्याने प्रभागातील स्वच्छतेवर परिणाम झाला असल्याचे पत्र नुकताच प्रभाग २३ चे नगरसेवक बाल्या बोरकर यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना दिले. बोरकर यांच्याप्रमाणेच माजी नगरसेवक अरुण डवरे यांनीही गोधनी, झिंगाबाई टाकळीतील स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी केल्या. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT