Girl create mashroom farm in home  
नागपूर

Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

सतीश तुळसकर

उमरेड (जि. नागपूर) : जगभरात कोरोनाने विळखा घातला त्यात अनेकांचे रोजगार हिरावले , आर्थिकदृष्ट्या लोकांचे पार कंबरडे मोडले त्यातून अनेकांनी स्वतःला सावरून घेतलं तर काहींचे खच्चीकरण झाले , मनोधैर्य खचले .बऱ्याच लोकांना आपलं आवडीचं क्षेत्र सोडून पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर भाजी विकावी लागली तर कुणी आपल्या शिक्षणाचा , कौशल्याचा वापर करत तग धरून राहिले.

कोरोनाच्या महामारीसोबतच ग्रामीण भागातील अर्थकारण ज्या शेतीवर अवलंबून असते ती शेती सुद्धा हवामानाच्या बेतालपणामुळे साथ सोडू लागली खरीप हंगामातील सोयाबीन ची अतिवृष्टीने राखरांगोळी केली तर परतीच्या पावसाने कापसाचे पीक भिजवले . पण या व्यतिरिक्त काहींनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतात नवनवे प्रयोग करून शेती पिकवली . 

अशीच एक अनोखी कहाणी आहे उमरेड तालुक्यातील आपतूर  गावातील राहिवासी असलेले चव्हाण कुटुंब त्या घरातील मुलगी ही परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठात बीएस्सी अग्रीकल्चर विभागात कृषी विषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण पूर्ण करून नुकतीच गावी परतली होती ,सध्या ती आई सोबत उमरेड ला वास्तव्यास आहे तिचे नाव सुप्रिया चव्हाण असून  गावातील ४एकर जमिनीत तिचे वडील राबतात परंतु सततच्या नापिकीमुळे वैतागून रोजमजुरीच्या कामाला जातात,तिचा  भाऊ सुद्धा रोजमजुरी करतो .

सुप्रियाच्या मनात आधीपासूनच आधुनिक शेती व्यवसाय करून घरच्यांना हातभार लावायची ईच्छा होती ,तिने घरातील एका सहा बाय सहा च्या खोलीत मशरूम ची शेती प्रायोगिक तत्त्वावर करण्याचे ठरविले . 

असा केला प्रयोग 

२०० लिटर च्या ड्रम मध्ये १०० लिटर पाणी घेऊन त्यात दहा ते बारा ग्रॅम बविस्टीन रसायन आणि १२५ मिली लिटर फॉर्मलीन अशे घटक टाकायचे त्याने पाणी निर्जंतुक होईल आणि अनावश्यक बुरशी चा नाश होऊन आवश्यक तीच बुरशी वाढण्यास मदत होईल त्यानंतर त्या पाण्यात गव्हाचा भुसा ( गव्हांडा) घालून अठरा तास भिजत ठेवून तो ड्रम हवाबंद करून अठरा तासांच्या कालावधीनंतर गव्हाचा भुसा बाहेर काढून त्यास पसरवून एक दिवस वाळत ठेवायचा आणि मग गव्हांडा आणि मशरूम च्या बियाण्याचे चार ते पाच थर घेऊन ते प्लास्टिक च्या पिशवीत बंद करायचे जेणेकरून त्यास वारा आणि प्रकाश मिळणार नाही ते तसेच १५ दिवस हवाबंद करून ठेवल्यानंतर ते बेड बाहेर काढून दोरीच्या साहाय्याने झूला बनवून त्यात ते अठरा दिवस लटकवून ठेवायचे आणि दररोज २-२तास त्या खोलीत बाहेरची हव येईल अशी सोय करायची आणि दिवसातून २-३ वेळा पाणी द्यायचे .

असा सगळा प्रकार करून मशरूम चे पहिले पीक निघेल आणि हळूहळू दुसरे आणि तिसरे पीक आहे एकंदरीत ४०-५०दिवसात ताज्या मशरूम चे पीक कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येऊ शकते सुप्रिया ने सांगितले .

मशरूम महत्वाचे  

मशरूम ची मागणी मोठ्या प्रमाणात असून त्याची भाजी , सामोसे , पिझ्झा , पुलाव ,औषधीम्हणून वापरात येणारे पावडर इ साठी उपयोगात येते आणि मशरूम मध्ये औषधी गुण असल्याने त्याचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे तिने सांगितले . जीवनसत्व , प्रथिने मुबलक प्रमाणात मशरूम मध्ये असल्याने लोकांची मागणी असते  पुढे हा मशरूम चा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करून ती आपल्या कुटुंबाचे अर्थकारण सुधारण्यास मदत करणार आहे . 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT