Give Judo Karate training to Girls in School seek Shikshak bharti
Give Judo Karate training to Girls in School seek Shikshak bharti  
नागपूर

शालेय मुलींना स्वरक्षणासाठी जुडो-कराटेचे प्रशिक्षण द्या; शिक्षक भारतीचे राज्यपालांना निवेदन

मंगेश गोमासे

नागपूर, ः महाराष्ट्र राज्यांतील शाळा- महाविध्यालयातील १८ वर्षांखालील मुलींना ( इयत्ता ५ वी ते १२ वी ) लैगिक अत्याचारापासून संरक्षण देण्याचा हेतूने जुडो ,कराटे व मार्शल आर्टचे प्रशिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे सरचिटणीस प्रा. सपन नेहरोत्रा केली आहे. यासंदर्भात प्रा. सपन नेहरोत्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नागपूर येथील राजभवन येथे भेट घेवून निवेदन सादर दिले.

मागील दोन वर्षापासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. विशेष: अल्पवयीन मुलीवर अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. त्यातूनच रस्त्यावरील होणारी छेडछाड,सार्वजनिक वाहनात नको असलेल्या पद्धतीने लैगिंक स्पर्श केले जाते.

समोरील अनोळखी व्यक्तीने लैगिंकदृष्ट्या स्पर्शकरण्यास भाग पाडण्याच्या घटना, शाळा सुटल्यावर मागे लागणे पाठलाग करणे, ऍसिड हल्ला इत्यादी घटनांवर आळा घालण्यासाठी, मुलींना स्वतः बचाव करता यावा यासाठी जुडो, कराटे व मार्शल आर्ट चे प्रशिक्षण दिल्याने आत्मविश्वास निर्माण होईल. तेव्हा प्रत्येक शाळेत जुडो ,कराटे व मार्शल आर्ट प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी ही मागणी प्रा नेहरोत्रा यांनी केली. 

यावेळी शिक्षक भारतीचे सरचिटणीस प्रा सपन नेहरोत्रा,जागृक पालक परिषदेचे अध्यक्ष गिरीश पांडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मंगेश कामोने उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT