gmc iggmc and super specialty hospital have rights to spend only 10 percentage fund nagpur
gmc iggmc and super specialty hospital have rights to spend only 10 percentage fund nagpur 
नागपूर

मेडिकल-सुपर-मेयोला भिकेचे डोहाळे, केवळ१० टक्के खर्च करण्याची अट पडतेय महाग

केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय रुग्णालयात औषधींसह वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत करण्याचा तुघलकी निर्णय भाजप सरकारने २०१७ मध्ये घेतला. यामुळे एकूण अनुदानाच्या १० टक्केच निधी खर्च करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाजवळ राहिले. परिणामी मेडिकल, मेयो, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला आर्थिक भिकेचे डोहाळे लागले आहेत. 

सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागासह राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्वच विभागांनी औषधी, तत्सम वस्तू आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी ही हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फतच करणे बंधनकारक करण्याचा निर्णय २६ जुलै २०१७ रोजी तत्कालीन भाजप सरकारने घेतला. या निर्णयामुळे औषधी व वैद्यकीय उपकरणांचे दर आणि मानके यात एकसूत्रता राहून दर्जा व गुणवत्ता आणखी सुधारण्यास मदत होईल. तर एकत्रित खरेदीतून पारदर्शकता निर्माण होईल, असा देखावा केला होता. मात्र, याचा फटका रुग्णालयांना बसला. तत्कालीन सचिवांनी मेडिकल, मेयो, व सुपर स्पेशालिटीसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील खरेदीचा निधी हाफकिनकडे वळता करण्यासाठी सूचना दिल्या. विदर्भातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा सुमारे २०० कोटीचा निधी हाफकिनच्या तिजोरीची शोभा वाढवत पडून आले. तेव्हापासून खरेदी प्रक्रिया राबवण्यात हाफकिन नापास झाले. आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मिळणाऱ्या एकूण अनुदानापैकी १० टक्के खर्चाचे अधिकार स्थानिक प्रशासनाच्या हाती ठेवले. मेडिकलला १० कोटीचे एकूण अनुदान दरवर्षी मिळते. त्यांना वर्षभरात केवळ १ कोटी रुपये खर्च करता येतील. मेयोचे अनुदान ६ कोटी आहे, तर मेयोच्या अधिष्ठातांना वर्षभरात केवळ ६० लाख खर्च करता येतील. सुपरचे अनुदान केवळ २ कोटी आहे, तर सुपरच्या अधिकाऱ्यांना केवळ २० लाख रुपये खर्च करता येतील. 

दरवर्षाला १४ लाख रुग्णांची नोंद - 
सध्या संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांबरोबरच अन्य विभागांतील रुग्णांनाही औषधे मिळत नसल्याने गोरगरीब रुग्णांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. वर्षभरात मेडिकलमध्ये ७ लाख रुग्णांची नोंद होते. मेयोत सुमारे ५ लाख रुग्णांची नोंद होते. तर सुपर स्पेशालिटीत २ लाख रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार होतात. यांना साधी औषधं देण्यासाठी निधी नसल्याची शोकांतिका येथे दिसून येते. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT