GMC not admitted to corona positive patients in nagpur 
नागपूर

कोरोनाबाधित महिलेला 'मेडिकल'ने दाखविला बाहेरचा रस्ता, मेयोने दिला आधार

केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी नेमक्या किती खाटा आहेत, याचे उत्तर प्रशासनाला माहीत नाही. प्रशासनाने मेडिकलमद्ये ६०० खाटा असून ४०० खाटा प्रस्तावित असल्याचे सांगितले. मात्र, मेडिकलमध्ये कोरोनाबाधित महिलेला दाखल करून घेण्यास चक्क डॉक्टरांनी नकार दिला. मेडिकलच्या ट्रॉमा युनिटमध्ये पोहोचलेल्या ६५ वर्षीय महिलेस बाहेरचा रस्ता दाखवला. अखेर या महिलेला मेयो रुग्णालयाने आधार दिला.

रात्री १० वाजता या महिलेस मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकलमध्ये २९९ कोरोनाबाधित दाखल आहेत, तर मेयो रुग्णालयात ३१० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मेडिकलमध्ये ६०० खाटा असल्याचे सांगण्यात येते. यामुळे उर्वरित ३०० खाटा रिकाम्या असताना मेडिकलमध्ये रुग्णांना दाखल करण्यात येत नाही. हा एकप्रकारचा कोरोनाबाधितांच्या जिवाशी खेळ करण्यात येत असल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाइकांनी केली आहे. रात्री मेडिकलमध्ये पाच अतिदक्षता विभागांसह इतरही वॉर्ड हाउसफुल्ल झाल्याचे कारण सांगत ट्रॉमा केअर युनिटमध्ये रात्री १० वाजता आलेल्या महिलेस मेयोत जा, असे सांगण्यात आले. 

मेडिकलमधील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे नव्याने वॉर्ड तयार करण्यासाठी रात्री मेडिकलमध्ये आले. मोबाईलवरून इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रात्री वॉर्ड तयार केला. त्या महिलेस रात्री दाखल करून घेण्यात येईल, असे सागंण्यात आले. मात्र, ट्रॉमा युनिटमधील डॉक्टरांनी खाटा शिल्लक नसल्याचे सांगून मेयोत पाठवले. यामुळे ती महिला मेयोत गेली. मेयोत तिला दाखल करून घेण्यात आले. 

मेयोत तोकडे मनुष्यबळ - 
मेयो रुग्णालयात तोकडे मनुष्यबळ आहे. गतवर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त पदे मंजूर करीत तेथे परिचारिकांना पाठविण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तेथील मनुष्यबळ मूळ ठिकाणी हलवण्यात आले. यामुळे मेयोत आता कोरोनाबाधितांवरील उपचार करण्यासाठी परिचारिकांची संख्या कमी आहे. सध्या ३१० रुग्ण मेयोत दाखल आहेत. येथील १०० रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

Numerology: 'या' जन्मतारखांच्या लोकांवर असते बुध-शुक्राची कृपा; कमी मेहनतीत मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Rabid Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याने आळे गावात उडवली खळबळ; नऊ जणांना चावा, अनेकांना रुग्णालयात हलविले

SCROLL FOR NEXT