Goes to the shop at Sitabardi, Just be careful
Goes to the shop at Sitabardi, Just be careful 
नागपूर

नागपुरातील सीताबर्डीत येथील दुकानात जाताय... जरा सावधान

योगेश बरवड

नागपूर :  "मिशन बिगीन अगेन' सोमवारपासून सुरू झाले. 80 दिवस "लॉक' झालेले नागपूर शहर पुन्हा नवा श्‍वास घेत सुरू झाले. या शहराला वैभव प्राप्त करून देणारा "सीताबर्डी एरिया'ही पुन्हा कधी नव्हे तो एवढ्या दिवसानंतर बोलका झाला. होय बोलकाच. कारण या एरियात जाताच "बोल' कानी पडतात. हे बोल रस्त्यावरच्या हॉकर्सचे असतात. "ले लो ले लो...रस्ते का माल सस्ते में' म्हणत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. अख्ख्या नागपूर शहरात प्रसिद्ध असलेले हे मार्केट खुलले. नागपूरकरांना पुन्हा येथे जाण्याचा मोह नक्कीच होणार. नागपूरकरांनो तुम्ही नक्की जा. परंतु सावधान... या मार्केटमध्ये दुकाने "ऑड-इव्हन'चा फार्म्युला पाळत असले तरी एक धोक्‍याची मोठी घंटा येथे खणखणताना दिसते.

शासनाने टप्प्याटप्याने परवानगी दिल्याने "मिशन बिगीन अगेन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सीताबर्डी मार्केटनेही "पुनश्‍च हरिओम'चा मंत्र जपला. पहिल्याच दिवशी सीताबर्डीचा मुख्य मार्ग ग्राहकांनी दुतर्फा फुलला होता. बाजारात परतलेले चैतन्य "होंगे कामयाब'चा विश्‍वास देणारे असले तरी याच चैतन्यातून कुठेतरी धोक्‍याची सूचनाही मिळत होती.

आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने ग्राहकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले. बाजारातील गर्दी व्यावसायिक आणि ग्राहकांचाही विश्‍वास वाढविणारीच होती. नागपूरचे हृदय असणाऱ्या सीताबर्डी बाजारात "ऑड इव्हन' फॉर्म्यूल्याचे कटाक्षाने पालन होताना दिसले. केवळ डाव्या बाजूचीच दुकाने सोमवारी उघडी होती. समोरच्या भागातील प्रतिष्ठानांची संपूर्ण रांगच बंद होती. तरीही एक गोष्ट सतत खटकत होती.

नागपूरकरांच्या बोलण्यात, वागण्यात, स्वभावातच एक वेगळा बिनधास्तपणा आहे. तोच बिनधास्तपणा आजही दिसून आला. ओसंडून वाहणाऱ्या गर्दीत भौतिक अंतराचे कुठेही पालन होताना दिसले नाही. कारवाईच्या भीतीने मास्क किंवा दुपट्टे प्रत्येकाकडे होते खरे. परंतु त्या मास्कने नाक आणि तोंड झाकण्याऐवजी बहुसंख्यकांनी ते मानेभोवती गुंडाळून ठेवण्यातच धन्यता मानल्याचे दिसले. सोमवारपासून शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठा सुरू झाल्या. सम-विषमची भानगड अजूनही व्यावसायिकांच्या पचनी पडली नसल्याचे रस्त्याच्या दुतर्फा सुरू असणाऱ्या प्रतिष्ठानांवरून लक्षात आले.

फुटपाथ विक्रेत्यांनी दोन्ही भागातील फुटपाथ व्यापले होते. यामुळे दुकानदारांनी नियमांचे पालन करूनही शिस्त पूर्णत: विस्कटलेली होती. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने ग्राहकही मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाहेर पडले. बाजारातील गर्दी व्यावसायिक आणि ग्राहकांचाही विश्‍वास वाढविणारीच होती. नागपूरकरांच्या बोलण्या, वागण्यात, स्वभावातील बिनधास्तपणा कोरोनाच्या संकटकाळात नक्‍कीच परवडणारा नाही.

हाच मोकळाधाकळा बाणा कोरोनाच्या मगरमिठीकडे नेणारा असल्याने नागरिकांनीच स्वत:हून काळजी घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. उपराजधानीत दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढतोय, रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस बढतीवरच आहे. त्यामुळे कुठून कसा कोरोना येईल आणि तुम्हाला मगरमिठीत घेईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सीताबर्डी किंवा इतरही गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग तसेच इतरही नियम पाळाल तरच कोरोनाला दूर ठेवता येईल.
 

मनपा आयुक्‍तांची भेट घेऊ
शहरात 40 हजार हॉकर्स असून, सर्व जण स्वाभिमानाने व्यवसाय करतात. लॉकडाऊनमुळे तीन महिने घरातच बसून रहावे लागले. तेही मेटाकुटीस आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार सीताबर्डी मेन रोडवर त्यांच्यासाठी लाल आणि पिवळ्या पट्टया आखून दिल्या आहेत. मर्यादेत राहूनच सर्व जण व्यवसाय करीत आहेत. कोरोनाचे संकट पाहता सोशल डिस्टन्सिंग आवश्‍यक आहे. त्यासाठी मनपा आयुक्तांची भेट घेऊन दोन्ही भागातील हॉकर्सना मर्यादा घालून व्यवसाय करू देण्याची मागणी करणार आहे.
आमदार प्रकाश गजभिये, हॉकर्स असोसिएशनचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT