नागपूर

गोरेवाड्याची बनावट वेबसाइट; जाणून घ्या अधिकृत साइट व पूर्ण माहिती

राजेश रामपूरकर

नागपूर : बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या नावाने बऱ्याच बनावट वेबसाइट तयार केल्याचे निदर्शनात आले आहे. पर्यटकांनी बनावट वेबसाइटवर दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूरची अधिकृत वेबसाईट http://www.wildgorewada.com ही आहे. या वेबसाइटवर पर्यटकांसाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील इंडियन सफारीची वेळ आता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवार ते रविवार सकाळी साडेआठ ते सायंकाळी ४.४५ पर्यंत पर्यटकांसाठी सुरू करण्यात येत आहे. यापूर्वी फक्त २.३० मिनिटापर्यंत सुरू होते. आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार वेळ वाढविण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

सोमवारी उद्यान बंद असते मात्र, त्यादिवशी १६ ऑगस्टला सुटी येत असल्याने सफारी सुरू राहणार आहे. मंगळवारी सफारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राणी उद्यानातील सफारीला येणाऱ्या पर्यटकांसाठी तिकीट बुकिंग फोन पे वर करता येणार आहे. सतत पाऊस झाल्याने सफारीतील रस्ते पर्यटकांसाठी अनुकूल राहत नसल्याने ऑनलाइन तिकीट बुकिंग बंद आहे. सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा सप्टेंबर २०२१ पासून सुरू करण्यात येत आहे.

गोरेवाडा उद्यानाच्या नावाने बऱ्याच बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे. http://www.wildgorewada.com ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सफारीच्या एन्ट्री प्लाझा येथे पर्यटकांसाठी कॅफेटेरिया व उपहारगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बाहेरचे खाद्य पदार्थ आणणे प्रतिबंधित आहे असे विभागीय व्यवस्थापक पी. बी. पंचभाई यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत पीएम मोदींच्या कार्यक्रमापूर्वी सुरक्षेत मोठी त्रुटी! बंदूकधारी अन् बनावट PMO अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नावही माहिती नसलेल्या खेळांचे बोगस प्रमाणपत्र! वर्ग १ आणि वर्ग २च्या नोकऱ्या मिळवल्या; दोघे अटकेत, एक हजार सर्टिफिकेट वाटल्याचा दावा

Duleep Trophy: शमी-मुकेशच्या माऱ्यासमोर दक्षिण विभागाची दाणादाण; पण पडिक्कल पाठोपाठ तिलक वर्माची झुंज, ठोकली तिसरी फिफ्टी

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

VIDEO: फार्महाऊसवर बिबट्याची एन्ट्री, मनसेच्या नेत्याचा पाळीव कुत्रा 'रॉकी'ची थरारक झुंज; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT