नागरिकांनी केलेली गर्दी
नागरिकांनी केलेली गर्दी नागरिकांनी केलेली गर्दी
नागपूर

कुजलेल्या नावेने केला घात; बॅक वॉटरमध्ये नाव मधातून तुटली

रमेश लांजेवार

कुही (जि. नागपूर) : नागपूर जिल्ह्यातील कुही येथे गुरुवारी (ता. २०) नाव बुडाल्याची घटना घडली. गोसेखुर्दच्या बॅक वॉटरमधून (Gosekhurd) ही नाव जात होती. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. कुजलेल्या नावेमुळे हा अपघात (Boat broken) घडल्याची माहिती समोर आली आहे. ही नाव शेतमालक व चालक परमानंद रामचंद्र तिजारे (५७) यांचीच आहे.

नावेत बसलेल्या महिला कुही तालुक्यातील कुजबा गावातील आहेत. सर्व महिला कापूस वेचण्यासाठी नावेत बसून नदीच्या पलीकडे असलेल्या शेतात जाण्यासाठी निघाल्या. नाव बॅक वॉटरच्या (Gosekhurd) अर्धात गेल्यानंतर उभी तुटली आणि सर्वजण पाण्यात बुडू लागले. महिलांनी आरडाओरड केल्याने काही लोक धावत आले. काही युवकांनी पाण्यात उडी घेऊन महिलांना वाचविण्यास सुरुवात केली.

मंगल घनश्याम भोयर, उमेश श्रावण बांधते, मोहन गोविंदा मेश्राम या युवकांनी महिलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. मनीषा राजू ठवकर (३२), मंगला देवराव भोयर (२७), यमू सुरेश साळवे (३२) व परमानंद रामचंद्र तिजारे यांना युवकांनी पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, एक महिला दिसत नसल्याचे महिलेने सांगितले. यानंतर मंगल भोयर याने पुन्हा पाण्यात उडी घेतली. शोध घेत त्याने गिता रामचंद्र निंबार्ते (२५) हिला पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, जास्त वेळ पाण्यात बुडून असल्याने तिचा मृत्यू झाला होता.

शुद्ध हरवलेल्या महिलांना मांढळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती जास्त खराब असल्याने मनीषा ठवकर व नाव चालक आणि शेतमालक परमानंद रामचंद्र तिजारे यांना नागपुरातील मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

दोन वर्षांपूर्वी घेतली होती नाव

परमानंद रामचंद्र तिजारे यांचे गोसेखुर्दच्या बॅक वॉटरच्या पलीकडे शेत आहे. त्यांना शेतातील कामासाठी नेहमी महिलांची गरज भासते. यामुळे त्यांनी दोन वर्षांपूर्वी नाव विकत घेतली होती. आता ती नाव कुजली होती. तरीही तिचा वापर सुरूच होता. गुरुवारी तिजारे हे कापूस वेचण्यासाठी महिलांना घेऊन जात होते. मात्र, वजन जास्त झाल्याने नाव मधातूनच तुटली (Boat broken) आणि सर्वजण बुडाले.

बाळाला कोण सांभाळणार?

या अपघातात गिता रामचंद्र निंबार्ते (२५) हिचा मृत्यू (woman died) झाला. तिला दीड वर्षाचा बाळ आहे. तिचा नवरा डोक्यानी कमजोर आहे. आता बाळाला कोण सांभाळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमचे जीव फक्त या गोसेखुर्दच्या बॅक वॉटरमुळेच जाणार आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.

महिनाभराआधी युवकाला जलसमाधी

महिनाभराआधीच गावातील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. एक महिन्यानंतर पुन्हा शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या महिला पाण्यात बुडाल्या. असे प्रसंग पुन्हा होऊ नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कुजबा गावातील शेती शासनाने अधिग्रहण करून शेतीचा मोबदला व घरांचा मोबदला गावकऱ्यांना देऊन पुनर्वसनाची सोय करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT