नागपूर

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार ! राज्य शासनाकडे सादर करणार ३०० कोटींची प्रस्ताव

रुग्णालयात वसतिगृहासह इतर संसाधनांची गरज लक्षात घेता आयुर्वेद विकासाची ब्लू प्रिंट प्रशासनाने तयार केली असून ३०० कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Government Ayurveda College: शहरातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाच्या विकास गेल्या काही वर्षांपासून खुंटला आहे. इमारतींची डागडुजी करण्यात येत आहे. मात्र येथील रुग्णालयात वसतिगृहासह इतर संसाधनांची गरज लक्षात घेता आयुर्वेद विकासाची ब्लू प्रिंट प्रशासनाने तयार केली असून ३०० कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या विकासकामाचा मॅप तयार करून दिला आहे. त्यानुसार जवळपास ३०० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. शासनाकडे याकरिता निधीची मागणी करण्यात येणार असून, लवकरच प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. आयुषची वाढती प्रगती लक्ष घेता आयुर्वेदिक शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदवीच्या जागा वाढविण्याची नितांत गरज आहे.

२०१९ मध्ये नागपुरातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांतील खाटांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. इंडियन सेंट्रल कौन्सिल ऑफ आयुर्वेदिक मेडिसिनच्या नियमानुसार नागपुरातील महाविद्यालय व रुग्णालयात २६० खाटा असायला हव्यात. परंतु येथे खाटांची संख्या १८० इतकी आहे. ही संख्या २६० करण्यासाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येईल. (Latest Marathi News)

२०१९ मध्ये इमारतीसाठी प्रस्तावित ४८ कोटीचा निधी होता. हा प्रस्ताव शासनाला पाठविण्यातही आला होता. परंतु शासनाकडून यावर सकारात्मक निर्णय झाला नाही. आता सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करून पाठविण्यात येणार आहे. विविध योजनांसाठी सुमारे ३०० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. या संस्थेत शल्य, शालाक्य, निदान थेरपी, पंचकर्म, स्त्रीरोग, बालरोग, रसशास्त्र, शरिररचना, शारीरिक क्रिया आदी १४ विभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

SCROLL FOR NEXT