Graduate constituency election abhijit wanjari on lead  
नागपूर

भाजपचा बालेकिल्ला ढासळणार? दुसऱ्या फेरतही महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी एकूण 7334 मतांनी आघाडीवर 

अतुल मेहेरे

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १ डिसेंबरला मतदान झाले. आज येथील मानकापूर क्रीडा संकुलात मतमोजणी सुरू आहे. दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी हे एकूण ७३३४ मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजपचे संदीप जोशी दुसऱ्या स्थानावर असून त्यांना १६ हजार ९५२ मते मिळाली आहेत. त्यामुळे आता भाजपचा बालेकिल्ला ढासळणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पदविधर निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भारताय जनता पक्ष अशी थेट लढत झाली. प्रचारादरम्यानही कधी महाविकास आघाडी, तर कधी भाजप मागेपुढे होत राहिले. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही नेमका अंदाज कुणाला लावता आलेला नव्हता. त्यामुळे पण गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने लढत अतिशय अटीतटीची झाली. 

त्यामुळे भाजपचा गढ यावेळी राखला जातो की नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. त्यामुळे मतदानानंतरही राजकीय जाणकार अंदाज लावायला कचरत होते. पहिल्याच फेरीत अभिजित वंजारींनी आघाडी घेतल्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत आनंद तर भाजपच्या गोटात चिंता दिसतेय. 

आजवर भाजपचा या मतदारसंघात पराभव झाला नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्यासमोर विजयी परंपरा कायम राखण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे काँग्रेस महाआघाडीने यंदा प्रथमच अ‌ॅड. अभिजित वंजारी यांच्या रूपाने अधिकृत उमेदवार दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बळ त्यांना मिळाले.

याशिवाय त्यांनी सुमारे दीड वर्षाआधीपासून या मतदारसंघात मशागत केली. यंदा बसपाने आपला उमेदवार जाहीर केला नाही. वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात होता. असे असले तरी यंदा भाजप विरुद्ध काँग्रेस, असा थेट मुकाबला झाला. आता अभिजीत वंजारी पहिल्या फेरीत आघाडीवर असल्यामुळे भाजपच्या गढाला सुरूंग लागतो की काय? अशी चर्चा रंगली आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT