Graduates apply for to inspect mosquito breeding grounds 
नागपूर

बेरोजगारीचे भीषण रूप! गरज दहावी पास उमेदवारांची; लागल्या पदवीधरांच्या रांगा

राजेश प्रायकर

नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने हंगामी डास उत्पत्ती स्थळे तपासणीससाठी काढलेल्या हंगामी जागांसाठी विज्ञान शाखेतील पदवीधरासह समाजशास्त्रातील पदव्यूत्तरांनीही अर्ज केले आहेत. डास उत्पत्ती स्थळे तपासणीसपदाच्या २५ जागांसाठी एक हजार ७३ अर्ज आले आहेत. या पदांसाठी केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवाराची गरज होती. यावरून बेरोजगारी किती भीषण रूप धारण करीत आहे हे लक्षात येते.

शहरात वाढलेल्या बेरोजगारीचे चित्र महापालिकेत दिसून आले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणीसच्या २५ पदांसाठी जाहिरात काढली होती. या पदासाठी केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे हे पद हंगामी असून, मानधनावर उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मात्र, शहरातील बेरोजगारीचे भयानक चित्र यानिमित्त दिसून आले. दहावी पात्रता लागणाऱ्या या पदासाठी विज्ञान आणि समाजशास्त्रातील पदव्युत्तरासह पदवीधरांनीही महापालिकेत मुलाखतीसाठी गर्दी केली होती. या हंगामी २५ पदांसाठी एक हजार १७३ अर्ज आल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्याने नमुद केले.

महापालिकेच्या आस्थापनेवर डास उत्पत्ती स्थळे तपासणीस हे पद नाही. त्यामुळे डासांची केंद्रे शोधण्यासाठी तूर्तास महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा वापर केला जात आहे. परंतु, केंद्र सरकारने राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण मोहिम राबविण्यासाठी मानधनावर डास उत्पत्ती स्थळे तपासणीस नियुक्त करण्यास परवानगी दिली आहे. या नियुक्त्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

नियुक्तीनंतर घरोघरी फिरावे लागणार

डासांवर नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत डास उत्पत्ती स्थळे तपासणीसांना घरोघरी फिरावे लागणार आहे. सध्या ही कामे महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी करीत आहेत. तोकड्या मनुष्यबळातही महापालिकेने डेंगी, मलेरियावर नियंत्रण मिळवले. विज्ञान शाखेत प्रवेश घेताना मोठी स्वप्न बघणाऱ्या तरुणांना डासांची उत्पत्ती स्थळे शोधावे लागणार आहे.

अनेकांना महापालिकेत स्थायी होण्याची आशा

महापालिकेत आलेल्या अनेक तरुणांना ही नोकरी हंगामी असल्याची जाणीव आहे. परंतु या मोहिमेसाठी सरकार कालावधी वाढवेल तर एखादवेळी स्थायी होण्याची अपेक्षाही काहींनी व्यक्त केली. विज्ञान शाखेत पदव्यूत्तर असलेल्या प्रफुल्ल कुडेने सरकारी नोकरीच्या शोधात या नोकरीसाठी महापालिकेत पोहोचल्याचे सांगितले. समाजशास्त्रातील पदव्यूत्तर राजश्री मेश्राम तरुणीनेही नोकरीची गरज असल्याने मुलाखतीसाठी आल्याचे सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT