Graduation election campaign guns cooled 
नागपूर

काँग्रेस, भाजपने केली प्रतिष्ठेची निवडणूक; मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी थंडावला. मंगळवारी (ता. १) मतदान प्रक्रिया होणार आहे. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता घरेघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यावर भर दिला आहे.

निवडणुकीचे वारे वाहू लागताच पक्षस्तरावर प्रचारही सुरू करण्यात आला होता. एकूण १९ उमेदवार रिंगणात असून, मतदारांची संख्या २ लाख ६ हजार आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला वेग आला. या मतदारसंघात पूर्व विदर्भातील सहाही जिल्ह्यांचा समावेश असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी चांगलेच परिश्रम घ्यावे लागले.

प्रत्येक ठिकाणी उमेदवार जाऊ शकत नसल्याने स्थानिक पुढारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारची धुरा सांभाळली. प्रमुख पक्षांनी मेळावे, सभांवर भर दिला. त्यात दिग्गज नेत्यांनीही हजेरी लावली.

काँग्रेस, भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. गत ५० वर्षांपासून वर्चस्व असलेला हा मतदारसंघ भाजपचा गड ठरला आहे. यंदा काँग्रेसकडून गडाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. दोन्ही मुख्य पक्षांसह अन्य उमेदवारांनीही व्यूव्हरचनेची आणखी केली. निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेत पक्षश्रेष्ठ मुंबई व दिल्लीतून घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. प्रचार संपल्याने आता छुप्या बैठका आणि मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

एक डिसेंबरला विशेष नैमित्तिक रजा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधार मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख तसेच खाजगी औद्योगिक आस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी मतदार यांना एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रवींद्र खजांजी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'जलद पुनर्विकासा'ला ब्रेक? जनाधार वाढवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपचा कायदेशीर सुरुंग

Nanded News: जनावरांचे दूधवाढीच्या नावाखाली फसवणूक, साडेचौदा लाख रुपयांचा ‘दुधारू गोल्ड’ जप्त

SCROLL FOR NEXT