नागपूर : गेल्या आठवड्याभरापासून उद्योजिका मेळाव्यात कर्तृत्ववान महिलांच्या सत्काराची परंपरा शेवटच्या दिवशीही कायम ठेवत महापालिकेने पाच महिलांचा गौरव केला. शेवटच्या दिवशीही नागरिकांनी विविध स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी केली.
ब्रेकिंग - आता लवकरच पॉर्नवर येणार निर्बंध
महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने रेशीमबाग मैदानावर आठवभरापासून आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचा रविवारी समारोप झाला. समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर मनीषा कोठे तर अध्यक्षस्थानी माजी महापौर अर्चना डेहनकर होत्या.
व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, उपसभापती दिव्या धुरडे, माजी उपसभापती विशाखा मोहोड, उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे, नगरसेविका मनीषा अतकरे, उषा पायलट, मंगला खेकरे, जयश्री वाडीभस्मे, इंनोव्हेशन इव्हेंटच्या श्रीमती नीरजा पठाणिया यांची उपस्थिती होती. दहा वर्षांपूर्वी महिला उद्योजिका मेळाव्याचे रोपटे लावणाऱ्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी समारोपीय कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन केले. उपमहापौर मनीषा कोठे यांनी महिला व बालकल्याण समिती व समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यात पद्मश्री सारडा, मृणाल हिंगणघाटे, डॉ. जयश्री शिवलकर, भूषणा गोणगाडे, शुभांगी तारेकर यांचा समावेश आहे. महिला उद्योजिका मेळाव्यातील उत्कृष्ट स्टाल्स धारकांना सन्मानित करण्यात आले. समाजकल्याण विभागातील कर्मचारी, समूह संघटिका यांनाही यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मधुरा बोरडे यांनी केले. आभार महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे यांनी मानले. अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने 'राधा ही बावरी' ही नृत्यनाटिका सादर केली.
उद्योजिका मेळाव्यात शनिवारी फॅशन शो आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात उर्मी छेडगे विजेत्या ठरल्या. पूजा राजोरिया ह्या प्रथम उपविजेत्या तर नूतन मोरे ह्या द्वितीय उपविजेत्या ठरल्या. याव्यतिरिक्त श्वेता त्रिपाठी (स्टाईल आयकॉन), हेमा शेंडे (मिस कॉन्जेनि×लिटी), पोर्णिमा मरस्कोल्हे (बेस्ट वॉक), नूतन मोरे (बेस्ट पर्सनॅलिटी), मनीषा बैनलवार (बेस्ट एस्थेटिक), पूजा राजोरिया (मिस फोटोजेनिक) आणि उर्मी छेडगे (मिस बॉडी ब्युटिफुल) यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.