Crime  Crime
नागपूर

लग्नाच्या दिवशी नवरदेव बेपत्ता; नवरीने दिली बलात्काराची तक्रार

महिनाभरापूर्वी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला

अनिल कांबळे

नागपूर : युवकाचे वस्तीत राहणाऱ्या युवतीशी तीन वर्षांपूर्वी सूत जुळले आणि प्रेमसंबंध वाढले. लग्नासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र, लग्नाच्या दिवशी नवरदेव अचानक बेपत्ता (Groom disappears on wedding day) झाला. सजून-धजून आलेल्या युवतीने सायंकाळपर्यंत न्यायालयात वाट पाहिली आणि घरी परतली. चिडलेल्या युवतीने पोलिस ठाण्यात जाऊन युवकाविरुद्ध बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा (Complaint of abuse) दाखल केला आहे.

पाचपावली परिसर सोडून दोघेही कपिलनगरात राहायला आले. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहू लागले. युवती शासकीय हॉस्पिटलमध्ये हाऊसकिपिंगचे काम करते तर तुषार हा बेरोजगार आहे. ती सतत लग्नाचा तगादा लावत असल्यामुळे महिनाभरापूर्वी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनीही न्यायालयात नोंदणी विवाह करण्यासाठी अर्ज सादर केला. न्यायालयाने ९ डिसेंबर लग्नाची तारीख दिली.

युवतीने लग्नाची तयारी केली आणि न्यायालयात पोहोचली. मात्र, तुषार अचानक बेपत्ता झाला. त्याचा मोबाईलसुद्धा बंद येत होता. त्यामुळे ती काळजीत पडली. आता येईल... मग येईल... अशी सायंकाळपर्यंत वाट बघितल्यानंतर ती हिरमोड होऊन घरी निघून गेली. तिची कुटुंबातील सदस्यांनी समजूत घातली. मात्र, तुषारला धडा शिकवायचा तिने ठरवले. तिने कपिलनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपी तुषार इंदूरकर हा फरार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: 24 तासांत 1,31,000 कोटी रुपयांचे नुकसान; इलॉन मस्क यांची संपत्ती रोज कमी का होत आहे?

kalyan Crime : कल्याण हादरले ! धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ठाण्यातून अपहरण केले अन्...

वाढलेले थायरॉईड कमी करण्यासाठी कोणते फळ खावे? वाचा एका क्लिकवर

उपायुक्तच बनल्या मालकीणबाई? मसाज, भांडीकुंडी अन् धमक्या… व्हिडिओ व्हायरल! सफाई कामगार महिलेचे धक्कादायक आरोप

समलैंगिक संबंध, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; CAची आत्महत्या; 22 वर्षीय तरुणीसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT