file photo 
नागपूर

 त्यांनी लढवली अनोखी शक्‍कल, पण झाली अटक 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : फार्मसीच्या मालकाने मित्राच्या मदतीने पोलिसांकडून सवलत असलेल्या वाहनात सलाइनच्या डब्यात दारूच्या बाटल्या ठेवल्या तर दारूची तस्करी करणाऱ्या एका टोळीला तहसील पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून रोख 2 लाख 78 हजार 100 रुपये आणि 23 हजार 868 रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास केली. 

लॉकडाउनमुळे दारूच्या व्यवसायात आता चौपट नफा असल्याचे लक्षात येताच फार्मसी मालक राहुल सदावर्ते याने दारू तस्करीचा व्यवसाय सुरू केला. मागील महिन्यांपासून त्यांचा हा गोरखधंदा सुरू होता. दारूच्या पेट्या आणण्यासाठी ते चारचाकी वाहनाचा वापर करीत असत. चारचाकी वाहनाच्या काचेवर "जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक' असे स्टिकर लावत होते. त्यामुळे कुणीही त्यांच्यावर संयश घेत नव्हते. शहरात दारूची दुकाने बंद असतानादेखील तहसील परिसरात मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जाते, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी माहिती काढली असता चौघांचीही माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्यांना पकडण्यासाठी मेयो हॉस्पिटल चौक आणि गोळीबार चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. रविवारी रात्री चारही आरोपी हे (एमएच 35 पी 3050) क्रमांकाच्या कारने गोळीबार चौकात आले. पोलिसांनी त्यांना अडवून पाहणी केली असता कारमध्ये सलाइनच्या पेट्या आणि त्याखाली दारूच्या पेट्या मिळून आल्या. पोलिसांनी 180 मिलीच्या 47 ऑफसर्स चॉईस, 90 मिलिच्या रॉयल स्टॅगच्या 146 बाटल्या, 90 मिलीच्या सिमरनऑफ वोडकाच्या 66 बाटल्या, पाच पेट्या सलाइनच्या मिळून आल्या. 
पोलिसांनी सलाइनच्या आणि दारूच्या पेट्या, कारसह 12 लाख 11 हजार 958 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दारूच्या पेट्या त्यांनी भिवापूर येथून आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची 29 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी घेतली. ही कारवाई पीआय जयेश भांडारकर, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, हवालदार लक्ष्मण शेंडे, शैलेश दाबोले, किशोर गरवारे, प्रवीण मानापुरे, पंकज डबरे, नजीर शेख यांनी केली. 

अधिक वाचा : शेतातील भाजीपाला आता सरळ दारासमोर 

हे आहेत आरोपी 
राहुल हरिश्‍चंद्र सदावर्ते (34) गोळीबार चौक, कल्पेश भीमराज नंदनवार (34) उदाराम मठमागे गोळीबार चौक, गणेश चंद्रकांत सदावर्ते (30) आणि रोशन लक्ष्मीचंद बारापात्रे (29) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. राहुलचे मेहंदीबाग चौकात स्पर्श नावाची फार्मसी आहे तर कल्पेशचे भिसीकर मोहल्ला इतवारी येथे ओम टेडर्स नावाचे दुकान आहे. गणेश हा जिओ कंपनीत टेलिकॉम अभियंता असून रोशन हा फुलांच्या डेकोरेशनचा व्यवसाय करतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT