file 
नागपूर

पान खाऊन येतो म्हणून गेला, अन्‌ परत आलाच नाही, काय घडले त्याच्याशी ?

दिलीप गजभिये

खापरखेडा (जि.नागपूर):  उद्यापासून श्रावण मास सुरू होत आहे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी मासांहार केल्यानंतर संपूर्ण श्रावण महिन्यात मांसाहार न करण्याची परंपरा आहे. रविवार व आषाढ मास समाप्तीपूर्वी मित्रांसोबत मांसाहार करायला गेलेला युवक जेवणानंतर पान खाण्यासाठी दुचाकीने पानठेल्यावर गेला, अन्‌ पुन्हा परतच आलाज नाही. त्याच्याशी जे घडले ते अतिशय दुर्दैवी आहे.

अधिक वाचा : दिवसाढवळया "तो' चक्‍क अधिका-यामागे धावला कोयता घेउन, कारण काय होते...

अंधारात पडलेल्या प्रकाशाने डोळे दिपले
हेमंत विनायक माकोडे(वय 36, वार्ड नं.2 खापरखेडा) असे त्या तरूणाचे नाव आहे. युवक हा विवाहित असून मटनविक्रेता होता. श्रावण मासाचे औचित्य साधून दहेगाव रोड येथे एका हॉटेलमध्ये खानपान करण्यासाठी तो दोन मित्रांसोबत गेला होता. तिघांनीही सोबत मनसोक्‍त जेवण घेतले आणि हेमंतचे जेवण लवकर आटोपून विरुद्ध बाजूने असलेल्या एका पानटपरीवर गुटखा खाऊन येतो, असे सोबतच्या मित्रांना सांगून दुचाकीने निघून गेला. तो जात असताना समोरील एका अज्ञात वाहनाच्या लाईटचा प्रकाश डोळ्यावर आल्याने समोरिल काहीच दिसले नसल्याने मार्गाच्या बाजूला असलेल्या मुरूडच्या ढिगा-यावर आदळून जवळपास अंदाजे दहा मीटर दुचाकी घासत गेली. दरम्यान त्याच्या डोक्‍याला दगडाचा जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन पडलेला होता.

समोरचे दृश्‍य पाहून मित्र थबकले
बराच वेळ झाल्यानंतर मित्रांना त्याची आठवण झाले. सोबतचे सगळे मित्र त्याची वाट पाहत होते. ज्यामुळे मित्राचा पत्ता शोधत ते मार्गाने जात असताना समोरचे दृष्य पाहून ते थबकले. अंधुक प्रकाशात रक्ताच्या थारोळ्यात हेमंत पडलेला दिसला. मार्ग वर्दळीचा असल्याने बघ्यांची
गर्दी जमली व खापरखेडा पोलिसांना घटनेची माहिती दिली. लागलीच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृताला उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविले व घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी घटनेची नोंद करून ठाणेदार काळे यांच्या मार्गदर्शनात खापरखेडा पोलिस पुढील तपास सुरू आहे.
 
संपादन : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींचा १ तासाचा कार्यक्रम, रस्ता ७ दिवसांसाठी बंद का? उच्च न्यायालयात याचिका दाखल

Hapus Mango Prices : रत्नागिरी हापूस थेट 1000 रुपये डझन; सोलापूर मार्केट यार्डात आंब्यांचे भाव गगनाला भिडले, कर्नाटकी हापूसचा दर काय?

Latest Marathi News Live Update : शिवसेनेतील फुटीमागे चुकीच्या माहितीचे राजकारण; आमदार माऊली कटके यांचा दावा

Sangli Gool Bazaar: तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती! सांगलीचा गूळ बाजार १२ दिवसांपासून ठप्प, कोट्यवधींची उलाढाल बंद, कर्नाटकातून आवकही थांबली

IND vs AFG 2nd ODI: नितीश कुमार रेड्डीची निवड का केली नाही? BCCI चे चिंता वाढवणारे अपडेट्स; नवा ओपनर दुसऱ्या षटकात OUT

SCROLL FOR NEXT