file 
नागपूर

सावधान ! सिम कार्ड "अपडेट' करून देतो म्हणाला, अन्‌ हाती दिल्या तूरी...

सतिश तुळस्कर

उमरेड (जि.नागपूर) : आम्ही तुमचे सिम कार्ड "अपडेट' करून देत आहोत. तुमच्या मोबाईलवर एक लिंक देत आहोत, त्यावर "कन्फर्म'केल्याची बटण दाबा, म्हणजे तुमचे सिम कार्ड क्षणार्धात होईल "अपडेट'...असे सांगताच तरूणाने अगदी सांगितल्याप्रमाणे केले आणि झालेल्या प्रकारानंतर चक्‍क त्याने स्वतःच्याच थोबाडीत मारून घेतली.

अधिक वाचा : नराधमाला बाप म्हणावे की आजोबा? सावत्र बापाने केलेल्या बलात्कारातून मुलीची प्रसुती

तरूणाची झाली फसवणूक
अनेकदा अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेल्या फोन "कॉल'ला फसून लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे ऐकिवात आहे. मात्र, गुरुवारी (ता. 16) उमरेड शहरातील सोनेझारी येथे राहणाऱ्या 37 वर्षीय तरुणाची अज्ञात व्यक्तीकडून फोन कॉलच्या माध्यमातून ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याचे पोलिस तक्रारीवरून निदर्शनास आले. फिर्यादी दीपक माणिकराव डोंगरे (वय 37, सोनेझरी) यांच्या मोबाईलवर अज्ञात मोबाईल क्रमांक 9002529760 वरून एक "कॉल' आला. त्यावरून आम्ही तुमचे एअरटेल कंपनीचे सिम "अपडेट' करून देतो. तेव्हा आम्ही तुमच्या मोबाईलवर alt24hservice@yahoo.com अशी एक लिंक पाठवू. तेव्हा तुम्ही ती लिंक ओपन करून कन्फर्म करण्याकरिता एक दाबा, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी आलेली लिंक ओपन करून कन्फर्म करण्याकरिता एक नंबर टाकतो आणि मग काही वेळातच त्याचे सिम हॅक करण्यात आले.

अधिक वाचा :  पाऊस आला धावून, शेत गेले वाहून, मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

पोलिसांत दिली तक्रार
तद्‌नंतर फिर्यादीच्या आयसीआयसीआय बॅंक शाखा उमरेड येथील खाते क्रमांकावरून 1 लाख 84 हजार रुपये लंपास करण्यात आले. आरोपीने मोबाईलवरून ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लगेच फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद करून पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.

संपादन : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT