file 
नागपूर

मुख्याध्यापक गेले मित्राच्या पार्टीला, अन्‌ घडले हे....

सकाळ वृत्तसेवा

कुही (जि.नागपूर) :  तालुक्‍यातील उमरेड कऱ्यांडला अभयारण्यालगत असलेल्या चिकणा येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सुनील बबनराव बिसणे (वय50, उमरेड) यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब मंगळवारी (ता.17) सायंकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली.

रात्री घरी परतेच नाही
प्राप्त माहितीनुसार सुनिल बिसणे हे सोमवारी रात्री साडेसात आठच्या दरम्यान मित्राकडे पार्टी असल्याचे पत्नी सुहासिनी यांना सांगून घरुन गेले. रात्री ते घरी परत आलेच नाही. त्यामुळे घरच्यांची चिंता वाढली. पत्नी सुहासिनी यांनी सर्व सबंधीत नातेवाईक व मित्रांकडे फोन करुन विचारणा केली. मात्र ते आलेच नसल्याचे उत्तर सर्वांकडून मिळाले. सुहासीनी यांनी चिकणा येथे पोलिस पाटील सुर्यकांता निकोसे यांच्याकडे ही माहिती दिली. निकोसे यांनी शोधाशोध केली. मात्र ते कुठेच आढळले नाही. उमरेड ते सेव मार्गावर असलेल्या विहिरीजवळ बिसणे यांची चप्पल व चष्मा पडलेला दिसला.

कर्जबाजारीपणामुळे होते त्रस्त
उमरेड पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले. गळ टाकून शोध घेतला असता मृतदेहच गळाला लागला. मुख्याध्यापक बिसणे हे कर्जबाजारीपणामुळे काही दिवसांपासून तनावात दिसत होते. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा परिसरात आहे. बिसणे यांच्या पश्‍चात पत्नी सुहासीनी, मुलगा हर्षल, मुलगी गुंजन असा मोठा आप्तपरिवार आहे. मुलाने आताच दहावीची परीक्षा दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT