heavy rain in vidarbha this year  
नागपूर

मान्सूनची यंदाही विदर्भावर मेहरबानी; हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; 4 जिल्ह्यांमध्ये स्थिती निराशाजनक

नरेंद्र चोरे

नागपूर : विदर्भातून निरोप घेण्याच्या तयारीत असलेल्या मॉन्सूनने यंदाही विदर्भावर मेहरबानी केली आहे. मॉन्सूनने दमदार हजेरी लावत प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज शंभर टक्के खरा ठरविला.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ९४३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ८५२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली,

जो सरासरीइतका पाऊस मानला जात आहे. विदर्भात अकोला (- २७ टक्के), यवतमाळ (-२४ टक्के), अमरावती (-२० टक्के) आणि चंद्रपूर (-१८ टक्के) हे चार जिल्ह्यांचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांनी सरासरी गाठली. सर्वाधिक १६ टक्के पाऊस वाशीममध्ये झाला. नागपूर जिल्ह्यातही पावसाने सरासरी गाठली. 

२०१५ पासूनचा इतिहास बघितल्यास यंदा तिसऱ्यांदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. २०१५ मध्ये ८४८ मिलिमीटर, २०१६ मध्ये १०४४ मिलिमीटर, २०१७ मध्ये ७३१ मिलिमीटर, २०१८ मध्ये ८७५ मिलिमीटर आणि गतवर्षी सर्वाधिक १०५४ पावसाची नोंद करण्यात आली. 

मागील चार महिन्यांत नागपुरात सर्वाधिक पाऊस (४०७ मिलिमीटर) जुलै महिन्यात कोसळला. तर गोंदियामध्ये ७०९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दमदार पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली असून, विदर्भातील तलावही काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षात जास्त पाऊस

भारतीय हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाजही तंतोतंत खरा ठरला. लागोपाठ दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. देशात यावर्षी १०९ टक्के पाऊस पडला. १९५८ नंतर सलग दोन वर्षे अधिक पाऊस पडण्याची गेल्या ६२ वर्षांतील ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९५८ मध्ये ११० टक्के व त्यानंतरच्या वर्षी ११४ टक्के पावसाची नोंद झाली होती.

संपादन - अथर्व महांकाळ  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT